Vastu Tips: घराची ही दिशा दूषित झाल्यास प्राणावरही येऊ शकते संकट

आध्यात्म
Updated Jun 30, 2022 | 17:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips: घराच्या प्रत्येत दिशेला वास्तुशास्त्रात महत्त्वाचे स्थान असते. प्रत्येक दिशेचे आपले महत्त्व असते. घराची दक्षिण-पश्चिम दिशेला विशेष महत्त्व आहे. 

vastu tips
घराची ही दिशा दूषित झाल्यास प्राणावरही येऊ शकते संकट 
थोडं पण कामाचं
  • नैऋत्य दक्षिण तसेच पश्चिम दिशेदरम्यानचा कोन आहे
  • ही उपदिशा शत्रूंचा नाश करते कारण याचा स्वामी राक्षस आहे.
  • नेकदा या दिशेमुळे मनुष्याच्या प्राणावरही संकट येते.

मुंबई: वास्तुमध्ये(vastu) प्रत्येक दिशा आणि उपदिशेचे आपापले महत्त्व असते. जर याचा विचार करून घराची(home) निर्मिती केली तर परिणाम नेहमीच शुभ फळ देणारे ठरतील. दक्षिण(south) आणि पश्चिम(west) यांच्यातील दिशा म्हणजे नेऋत्य. ही दिशा व्यक्तीच्या चरित्रावर मोठा प्रभाव टाकते. हा कोपरा व्यक्तीच्या चरित्राचा परिचय करून देतो. मात्र जर हा कोपरा दूषित असेल तर तेथे राहणाऱ्या व्यक्तीचे चरित्र दूषित होऊ शकते. तुम्हाला आपापसातील शत्रूत्व अधिक मानसिक तणाव देते. जर खटला सुरू असेल तर विजय मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. 

अधिक वाचा - राणाजगजितसिंह पाटील यांची लागणार कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी

नैऋत्य दक्षिण तसेच पश्चिम दिशेदरम्यानचा कोन आहे आणि ही उपदिशा शत्रूंचा नाश करते कारण याचा स्वामी राक्षस आहे. अनेकदा या दिशेमुळे मनुष्याच्या प्राणावरही संकट येते. ही उपदिशा दूषित असल्या कारणाने घरावरही नकारात्मक उर्जेचा प्रभाव राहतो. 

नैऋत्य दिशेचा स्वामी राहू आहे. ही दिशा वास्तु पुरुषाच्या दोन्ही पाय आणि तसेच टाचांना प्रभावित करतात. जर घरातील नैऋत्य दिशेची जागा रिकामी असेल आणि या जागी काटेदार वृक्ष असेल तर घरचा स्वामी आजारी, शत्रूंनी पिडीत तसेच संपन्नतेपासून दूर राहील. हे ही लक्षात ठेवली पाहिजे की जर नैऋत्येला मंदिर बनवण्यात आले तर घरातील सगळ्यात वयस्कर स्त्रीच्या पायांमध्ये पीडा तसेच आजार होण्याची शक्यता आहे. 

आर्थिक संकट येऊ शकते

जन्म कुंडलीतील आठवे आणि नववे स्थान नैऋत्य दिशेला प्रभावी राहते. यासाठी या दिशेला चांगले परिणाम मिळावे म्हणून नेहमीच भरलेली पाहिजे. परंतु ती जागा खाली राहिली तर गृहस्वामीचा खजाना रिकामा राहील. जर ईशान्य दिशेच्या अपेक्षेने नैऋत्य निम्न असेल आणि ईशान्यवरून नैऋत्य दिशेला पाण्याचा प्रवाह असेल तर शत्रूता वाढते. 

अधिक वाचा - शकीरासोबत निकचा बेली डान्स, Video बघून प्रियंका म्हणते.

नैऋत्य दिशेला किचन केल्याने वाद वाढो

नैऋत्य दिशेला किचन केल्यास पती-पत्नीमध्ये नियमित वाद होण्याची शक्यता असते. घरातील लोकांना गॅस्ट्रिक तसेच वायु विकार होण्याचा धोका संभवतो. नैऋत्यचा प्रत्यक कोपरा पूर्ण घरात संतुलित असला पाहिजे अन्यथा त्याचे दुष्परिणाम होतात. येथे बनणारे जेवणे हे विषारी होते. अनेक वर्ष या कोपऱ्यात जेवण बनत असेल तर घर मालकाला असाध्य रोग होण्याची शक्यता असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी