म्हणून ताटात एकाच वेळेस नाही दिल्या जात ३ पोळ्या, हे आहे कारण

आध्यात्म
Updated Apr 05, 2022 | 14:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

अनेकदा तुम्ही पाहिले असेल की भोजनाच्या थाळीमध्ये एकाच वेळेस ३ पोळ्या दिल्या जात नाहीत. एकतर एक अथवा दोन. यामागे धार्मिक कारणांसोबत वैज्ञानिक कारणही गरजेचे आहे. 

thali
म्हणून ताटात एकाच वेळेस नाही दिल्या जात ३ पोळ्या, हे कारण 
थोडं पण कामाचं
  • भोजनाच्या थाळीत नाही दिल्या पाहिजेत एकत्र ३ पोळ्या
  • हे असते अशुभ
  • वैज्ञानिक कारणही आहे जबाबदार

मुंबई: हिंदू धर्मात(hindu) व्रतवैकल्ये तसेच खास क्षणांपासून ते रोजच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत. यात झोपणे-उठणे, खाण्या-पिण्यापासून ते उठण्या-बसण्यासाठी काही नियम सांगितले आहेत. हे नियम अनेक शतकांपासून चालत आले आहेत आणि आपल्या परंपरेचा भाग बनले आहेत. दरम्यान, काहीजण या परंपरांचे पालन जरूर करत आहेत मात्र त्याच्यामागे असलेली कारणे त्यांना माहीत नाहीत. अशीच एक परंपरा म्हणजे ताटात ३ पोळ्या एकत्र वाढू नयेत. यामागे धार्मिक कारण तर आहेच मात्र वैज्ञानिक कारणही जबाबदार आहे. this is the reason why 3 rotis not serve at a time in plate

अधिक वाचा - तीस वर्षानंतर या राशीच्या लोकांचे नशीब चमकणार

३ मानला गेलाय अशुभ अंक

हिंदू धर्मात त्रिदेव म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी या सृष्टीची निर्मिती केली. त्यांना सृष्टीचे रचनाकार, पालनकार आणि संहारक सांगितले आहे. असे पाहिले तर मग ३ हा अंक शुभ असला पाहिजे मात्र याच्या उलट हे आहे. पूजा पाठ अथवा शुभ कामासाठी ३ हा अंक अशुभ मानला जातो. यासाठी जेवणाच्या ताटात एकत्र ३ पोळ्या ठेवू नयेत. 

मृत व्यक्तीच्या ताटात ३ पोळ्या

या पाठी मान्यता आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या त्रयोदशी संस्काराने पहिल्यांदा मृतकाच्या नावाने भोजनाची जी थाळी बनवली जाते त्यात ३ पोळ्या ठेवल्या जातात. यासाठी थाळीत ३ पोळ्या एकत्र ठेवल्या तर ते मृत व्यक्तीचे भोजन मानले जाते. त्यामुळे असे करण्यास मनाई केली जाते. 

अधिक वाचा - काश्मिरी पंडितांवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला

याशिवाय असेही म्हटले जाते की एखादी व्यक्तीथाळीमध्ये एकत्र ३ पोळ्या ठेवून खाल्ल्यास त्या व्यक्तीच्या मनात दुसऱ्या व्यक्तीबद्दल वादाचे भाव असतात असे म्हटले जाते. 

हे आहे वैज्ञानिक कारण

विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर एका व्यक्तीने एकाच वेळेस भरपूर जेवू नये. तर थोडे थोडे खाल्ले पाहिजे. एका सामान्य व्यक्ती एकदा एका वाटीत डाळ, एक वाटी भाजी, ५० ग्रॅम भात आणि दोन पोळ्या खाल्ल्या पाहिजेत. जर यापेक्षा जास्त जेवण केले तर आरोग्यासंबंधित समस्या होऊ शकतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी