मुंबई: सुखी दाम्पत्य जीवन(married life) हे मोठ्या आनंदाचे लक्षण असते. ज्या लोकांना त्यांच्या जीवनात हे सुख(happy life) मिळाले तर त्यांचे जीवन आनंदाने सफल होते. मात्र यासाठी नवरा-बायकोमध्ये(husband-wife) एकमेकांबाबत प्रेम आणि सन्मान असणे गरजेचे असते. सोबतच प्रत्येक गोष्टी समजुतीने घेतली पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी कूटनिती, राजनिती, अर्थशास्त्रासह व्यवहारिक जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांबाबतही निती सांगितली आहे. आचार्य चाणक्य यांनी नवरा-बायकोला काही चुका करण्यापासून वाचण्यास सांगितले आहे. This mistakes never happen in married life says chanakya niti
अधिक वाचा - अलिशान गाड्या राहूनही मूसेवालाला आवडायचा HMT5911 ट्र्रॅक्टर
एखाद्या गोष्टीवर वाद होणे ही सामान्य बाब आहे. मात्र रागामध्ये एकमेकांना अपशब्द वापरणे, अपमान करणे हे दाम्पत्य जीवनाचा पाया हलवू शकतात. त्यामुळे पती-पत्नीने रागावर नियंत्रण ठेवावे.
नवरा-बायकोचे नाते हे प्रेम आणि विश्वासावर टिकलेले असते. एकमेकांशी खोटे बोलणे अथवा नात्यात फसवणूक केल्यास नाते संपण्याची भीती असते. अनेकदा या कारणांमुळे नाते संपतेही.
नवरा-बायको यांच्यातील खाजगी गोष्टी बाहेर न पडलेल्याच बऱ्या असतात. जर नवरा-बायकोने आपल्यातील गोष्टी गुप्त ठेवल्या नाहीत आणि दुसऱ्यांना सांगितल्या तर हे त्यांच्यासाठी अपमानाचे कारण ठरू शकते. तसेच यामुळे दाम्पत्य जीवनात समस्या निर्माण करतात. यासाठी आपल्या गोष्टी नेहमी गुप्त ठेवा.
आपल्यासाठी आणि कुटुंबांच्या सुख-सुविधेवर खर्च करणे चांगली गोष्ट आहे. मात्र विनाकारण वायफळ खर्च केवळ आर्थिक समस्या घेऊन यतात. सोबतच नवरा-बायको यांच्यातील खर्चाला कारण ठरते. दरम्यान, नवरा-बायको दोघांनींही खर्च सांभाळून करावा.
अधिक वाचा - एसटी महामंडळाचा वाहननामा, बसचे बदलते रुपडे
नवरा-बायकोच्या नात्याची एक मर्यादा असते ती कधीही पार करू नये. चांगल्या नात्यासाठी दोघांनीही मर्यादा सांभाळून वागले पाहिजे.