Numerology:जीवनात कधी ना कधी मोठे पद जरूर मिळवतात या मूलांकाचे लोक

आध्यात्म
Updated Jul 19, 2022 | 14:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology:अंकशआस्त्र जन्मतारखेच्या आधारावर सांगते की ती व्यक्ती किती यशस्वी होणार आहे ते. या व्यक्ती आपल्या जीवनात मोठे पद मिळवण्यात यशस्वी होतात की नाही. 

numerology
जीवनात कधी ना कधी मोठे पद जरूर मिळवतात या मूलांकाचे लोक 
थोडं पण कामाचं
  • अंक ज्योतिषानुसार मूलांक १च्या व्यक्ती मनमिळावू असतात.
  • मूलांक १च्या व्यक्ती जन्मत:च लीडर असतात. या व्यक्ती इतरांना सोबत घेऊन चालतात.
  • 1 ला जन्मलेले लोक पायलट, डॉक्टर, इंजिनियर, लेखक किंवा सरकारी अधिकारी बनतात.

मुंबई: अंकशास्त्रात(numerology) मूलांच्या आधारावर गणना केली जाते. मूलांक म्हणजे जन्मतारखेची बेरीज असते. जसे एखाद्या महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक(mulank) १ असतो. मूलांक १च्या व्यक्तीवर सूर्याचा प्रभाव असतो. कारण यांचा स्वामी सूर्य(sun) असतो. या व्यक्ती खूप प्रभावी आणि चांगले लीडर असतात. आपल्या जीवनात कधी ना कधी मोठे पद मिळवतात. This mulank people get big achievement in life

अधिक वाचा - अमेरिकी तरुणीनं रचला स्वतःच्याच अपहरणाचा डाव

अशा असतात मूलांक १च्या व्यक्ती

अंक ज्योतिषानुसार मूलांक १च्या व्यक्ती मनमिळावू असतात. ते लवकरच एखाद्याच्या जवळ ातात. हे लोक गोड बोलतात आणि आपल्या सरळ व्यवहाराने समोरच्याचे मन जिंकतात. याशिवाय या खूप इमानदार असतात. आपल्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करत नाहीत. 

करिअरमध्ये मोठी उंची गाठतात

मूलांक १च्या व्यक्ती जन्मत:च लीडर असतात. या व्यक्ती इतरांना सोबत घेऊन चालतात. त्यांची काळजीही घेतात. आव्हानाचा सामना करायला त्यांना खूप आवडते. त्या कोणत्याही परिस्थितीत जिंकतात आणि जीवनात मोठी उंची गाठतात. या आपले काम कधीच अर्धवट सोडत नाहीत. या लोकांमध्ये टाईम मॅनेजमेंटचे स्किल खूप चांगले असते. प्रत्येक काम व्यवस्थित पद्धतीने करणे त्यांना आवडते. या कारणामुळेच त्या जीवनात खूप पैसा कमावतात. साधारणपणे यांची आर्थिक स्थिती चांगली असते. 

अधिक वाचा - नाग नागिणीची प्रणयदृष्ये कॅमेर्‍यात कैद, व्हिडीओ व्हायरल

मूलांक १च्या लोकांसाठी कोणतेही नवे आणि महत्त्वाचे काम करण्यासाठी रविवार आणि सोमवार हा चांगला दिवस आहे. यांच्यासाठी पिवळा रंग शुभ असतो. 

करिअर - 1 ला जन्मलेले लोक पायलट, डॉक्टर, इंजिनियर, लेखक किंवा सरकारी अधिकारी बनतात. या दिवशी जन्मलेल्या मुली खूप सुंदर असतात. या दिवशी जन्मलेल्या महिलांना संगीत कलांची प्रचंड आवड असते, असे म्हणतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी