Astrology Tips For Good Job: बेरोजगारी दूर करण्यासाठी करा हे सोपे उपाय, होईल चांगला लाभ 

Astro Tips To Get Good Job | देशासह जगातील अनेक देशांमध्ये बेरोजगारीच्या संकटाने विशाल रूप धारण केले आहे. अनेक देशातील तरूण-तरूणी उच्च शिक्षित असून देखील त्यांच्या हाताला अपेक्षित काम मिळत नाही. अशीच काहीशी स्थिती भारतात देखील उद्भवली आहे.

 This simple solution to eliminate unemployment, will be a great benefit 
बेरोजगारी दूर करण्यासाठी करा हे सोपे उपाय, होईल चांगला लाभ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देशासह जगातील अनेक देशांमध्ये बेरोजगारीच्या संकटाने विशाल रूप धारण केले आहे.
  • प्रवीण मिश्र यांनी बेरोजगारी कशी दूर करायची हे सांगितले आहे.
  • अक्षय्य तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीची पुजा करताना डोक्यावर केसर आणि हळदीचा टिळा लावावा.

Astro Tips To Get Good Job | मुंबई : देशासह जगातील अनेक देशांमध्ये बेरोजगारीच्या संकटाने विशाल रूप धारण केले आहे. अनेक देशातील तरूण-तरूणी उच्च शिक्षित असून देखील त्यांच्या हाताला अपेक्षित काम मिळत नाही. अशीच काहीशी स्थिती भारतात देखील उद्भवली आहे. कोरोनाच्या विशाल संकटापासून नोकरीचं सगळीकडेच अवघड झालं आहे, त्यामुळे तरूण मुले मुली भेटेल ते काम करून आपल्या गरजा भागवत आहेत. दरम्यान तुम्ही देखील या बेरोजगारीचा सामना करत असाल तर ज्योतिषी प्रवीण मिश्र यांनी बेरोजगारी कशी दूर करायची आणि चांगली नोकरी मिळवण्यासाठी कोणते सोपे उपाय करावेत हे सांगितले आहे. (This simple solution to eliminate unemployment, will be a great benefit). 

दरम्यान, ज्योतिषी प्रविण मिश्र यांच्या सल्ल्यानुसार, चांगली नोकरी मिळवण्यासाठी मंगळवारी हनुमानजींना ३ पाने आणि सिंदूर अर्पण करा आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रार्थना करा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 

अधिक वाचा : लग्न लागताच नवरा-नवरी असे लागले पळू, पाहा व्हिडिओ

चांगली नोकरी मिळवण्यासाठी करा हे उपाय

* मंगळवारच्या दिवशी हनुमानाला ३ पाने सिंदूर अर्पण करा. 
* मंदीरात बसून हनुमान चालिसाचे पठन करा.
* नंतर हनुमानजींची आरती करा. 
* त्यानंतर शेवटी चांगली नोकरी मिळण्यासाठी हनुमानाला प्रार्थना करा. 
* असे केल्यास लवकरच तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. 

अधिक वाचा : कुणाच्या अल्टिमेटमवर राज्य चालत नाही - संजय राऊत

आर्थिक चणचण दूर करण्यासाठी करा हे उपाय 

* आज अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोन्याची काहींना काही वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र या दिवशी सोन्याची लक्ष्मीची पावलं खरेदी करून घरी आणावी आणि त्याची विधीवत पूजा करावी. यामुळे तुमच्या घरात पैशाची कधीच कमतरता भासणार नाही. 

* अक्षय्य तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीची पुजा करताना डोक्यावर केसर आणि हळदीचा टिळा लावावा. असं केल्यानं लक्ष्मी देवीचा सहवास नेहमीच तुमच्या घरात राहतो. 

 * तसं बघायला गेल्यास सर्व प्रकारची पुजा करताना नारळ ठेवणं शुभ मानलं जातं. मात्र अक्षय्य तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीच्या पावलांवर नारळ ठेवल्यास देवी प्रसन्न होते. 

 * अक्षय्य तृतीयाच्या दिवशी साखर, खरबूज, तीळ, तूप, वस्त्र, चांदी, मीठ यांसह अन्य वस्तू ब्राम्हणांना दान केल्यास मन शांत राहतं आणि पैशाची चिंता सतावत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी