vinayaka Chaturthi 2022:विनायक चतुर्थीला बनतोय हा योगायोग, एकाच दिवशी गणपती-शंकराची पुजा

आध्यात्म
Updated Jul 29, 2022 | 15:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vinayak Chaturthi 2022: कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते. श्रावणात विनायक चतुर्थी १ ऑगस्टला येत आहे. 

vinayak chaturthi
vinayaka Chaturthi 2022 : विनायक चतुर्थीला बनतोय हा योगायोग 
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रात रवी योगाचे विशेष महत्त्व सांगितले आहे.
  • ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिना हा शिव कुटुंबाच्या पुजेसाठी लाभदायक असो.
  • विनायक चतुर्थीच्या दिवशी रवी योग निर्माण होत आहे. अशी मान्यता आहे की या दिवशी चंद्र दर्शन केले जात नाही. 

मुंबई: प्रत्येक महिन्यातील दोन पक्षांची चतुर्थी ही गणपती बाप्पाला(ganpati bappa) समर्पित केली जाते. कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी(sankashti chaturthi) म्हणतात तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी(vinayak chaturthi) म्हटले जाते. श्रावणात विनायक चतुर्थी १ ऑगस्टला सोमवारी साजरी केली जात आहे. यावेळेस भगवान शंकर आणि गणपतीची पुजा एकत्र केली जाईल. या दिवशी उपवास करून तुम्ही भगवान शंकरासह गणपतीचाही आशीर्वाद मिळवू शकता. This special yog on vinayak chaturthi

अधिक वाचा - वाळवंटात पूर, 'या' देशात पावसानं मोडला 27 वर्षांचा रेकॉर्ड

ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिना हा शिव कुटुंबाच्या पुजेसाठी लाभदायक असो. अशातच विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विशेष कृपा मिळवण्याचे योग आहेत. विनायक चतुर्थीच्या दिवशी रवी योग निर्माण होत आहे. अशी मान्यता आहे की या दिवशी चंद्र दर्शन केले जात नाही. 

विनायक चतुर्थी २०२२ मुहूर्त

श्रावण महिन्याची विनायक चतुर्थी तिथी १ ऑगस्ट सोमवारी ४ वाजून १८ मिनिटांनी सुरू होऊन २ ऑगस्ट मंगळवारी सकाळी ५ वाजून १३ मिनिटांनी संपेल. या दिवशी रवी योगाचे १ ऑगस्ट सकाळी ५ वाजून ४२ मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी ४ वाजून ६ मिनिटांनी राहील. या दिवशी गणेश पुजनाची शुभ वेळ सकाळी ११ वाजून ६ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ४८ मिनिटे यांच्यादरम्यान आहे. या दरम्यान पुजा केल्याने गणपतीची विशेष कृपा होते. 

यासाठी महत्त्वाचा आहे रवी योग

ज्योतिषशास्त्रात रवी योगाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. एखाद्या सण अथवा उपवासाच्या दिवशी रवी योग असणे खूप खास असते. ज्योतिषशास्त्रानुसार रवी योगात सूर्याचा प्रभाव अधिक असतो. यासाठी रवी योगात केलेली कामे शुभ फळ देतात. असे म्हणतात की हे योग अमंगल दूर करतात. अशातच रवी योगामध्ये भगवान गणेशाची पुजा मनोभावे केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच कामांमध्ये यश मिळते. 

अधिक वाचा - पूनम पांडेचा Bold लूक, सोशल मीडियाचा वाढला पारा

या दिवशी चंद्र दर्शन नको

शास्त्रांमध्ये असे सांगितले गेले आहे की विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन वर्ज्य आहे. द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाशी संबंधित एक घटना आहे. एकदा श्रीकृष्णाने विनायक चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेतले होते त्यानंतर त्याच्यावर स्यामंतक मणी चोरी केल्याचा खोटा आरोप लावला होता. हा आरोप खोटा असल्याचे सिद्ध करण्यासाठी श्रीकृष्णाला जामवंतशी अनेक दिवसांपर्यंत युद्ध करावे लागले होते. यानंतर कृष्णाची त्या खोट्या आरोपातून मुक्तता झाली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी