मुंबई: श्रावण महिन्यात(sawan month) शिव मंदिरांमध्ये(shiv temple) दर्शनसाठी जाणे तसेच प्रमुख तीर्थस्थळी जाणे खूप लाभदायक असते. यामुळेच श्रावण महिन्यात मुख्य शिव मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी असते. यातील अनेक प्राचीन मंदिरे आहेत आणि त्यांच्याशी संबंधित रहस्यांमुळे जगभरातील लोक दर्शन करण्यासाठी येथे येतात. गुजरातच्या वडोदरामध्येही असेच प्रसिद्ध मंदिर आहे जे दररोज गायब होते आणि पुन्हा दिसते. ही घटना पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने लोक येतात. This stambheshwar temple disappers two times in a day
अधिक वाचा - पालकांनो मुलांची काळजी घ्या; मुंबई, ठाण्यात पसरतोय 'हा' संसर
भगवान शंकराचे हे प्रसिद्ध मंदिर स्तंभेश्वर महादेव मंदिर समुद्रात स्थित आहे. अशी मान्यता आहे की हे मंदिर शंकराचे पुत्र कार्तिकेययांनी स्थापित केले होते. समुद्राच्या आत हे मंदिर २ वेळा पाण्यात जाते आणि पुन्हा दिसू लागते. दररोज समुद्रामध्ये याचा जलस्तर वाढल्याने मंदिर बुडते आणि जलस्तर कमी झाल्याने मंदिर पुन्हा दिसू लागते. ही घटना दररोज सकाळ आणि संध्याकाळी होते.
शिवमंदिर समुद्रात बुडल्याने आणि पुन्हा दिसण्याच्या या घटनेला भक्तगण समुद्राचा शिवजीला अभिषेक केल्याचे सांगतात. जेव्हा समुद्राचे पाणी वाढू लागते तेव्हा काही कालासाठी मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश बंदी केली जाते. स्कंद पुराण आणि शिव पुराणाच्या रुद्र संहितेमध्ये स्तंभेश्वर तीर्थ बाबत सांगितले आहे की राक्षस ताडकासुरने कठोर तपस्या करत शंकरांकडून वरदान घेतले होते की त्याचा वध केवळ शंकराचा पुत्रच करू शकतो. यानंतर ताजजकासूराच्या उत्पातापासून लोकांची सुटका करण्यासाठी केवळ ६ दिवसांच्या कार्तिकेयने ताडकासुराचा वध केला होता.
अधिक वाचा -
यानंतर ज्या ठिकाणी राक्षसाचा वध केला होता तेथे हे शिव मंदिर बनवण्यात आले. असे सांगितले जाते की या मंदिराचा शोध १५० वर्षांपूर्वी लागला.
महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामधील गोदावरी नदीच्या किनार्याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे. येथे भगवान शंकराची मूर्ती आहे पण त्यांचे वाहन नंदी बसवलेले नाही. पुराणानुसार, या मंदिरात भगवान महादेवाचा वास होता. तर पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाचे ५ मुख होते. चार मुख हे वेदोच्चारण करत असायचे तर पाचवे मुख हे नेहमी लोकांची निंदा आणि त्यांना वाईटपणे बोलत असायचे.