मुंबई: सौभाग्यवान, सुशिक्षित, संस्कारी महिला केवळ आपलीच नव्हे तर कुटुंबाचेही नशीब आणि आयुष्य बदलू शकतात. या वडिलांसोबत असो वा नवऱ्यासोबत प्रत्येक ठिकाणी खूप प्रेम आणि सन्मान मिळवतात. असं म्हणू शकतो की या महिला जन्मत:च नशीबवान असतात. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की अशा महिलांना कसे ओळखता येणार.this women are lucky who have this signs
अधिक वाचा - उर्फी जावेदने का बदलले नावाचे स्पेलिंग?
तळवे - समुद्रशास्त्रानुसार लकी महिलांची ओळख ही त्यांच्या तळव्याने होते. ज्या महिलांचे पाय कोमल, लालसर असतात ती लक्ष्मीचे रूप असतात. अशा महिला ज्या घरात असतात तेथे पैशांचा पाऊस पडतो. या शिवाय महिलांच्या तळव्यावर शंख, कमळ अथवा चक्राची आकृती असेल तर त्या मोठ्या पदावर पोहोचतात. नाहीतर या महिलांचे पती उच्च पदावर जातात.
नाकावर तीळ अथवा मस - जर एखाद्या महिलेचच्या नाकाच्या जवळ तीळ आणि अथवा मस्सा असेल तर ही सौभाग्याची निशाणी असते. अशा महिला सुखी-समृद्धी जीवन जगतात.
नाभीजवळ तीळ - ज्या महिलांच्या नाभीजवळ तीळ अथवा मस्सा असेल त्या आपल्या कुटुंबाचे नशीब चमकवतात. अशा महिलांचे कुटुंब वैभवपूर्ण आणि सन्मानजनक जीवन जगतात.
अधिक वाचा - महिमा चौधरीला झाला ब्रेस्ट कॅन्सर
हरणासारखे डोळे - ज्या महिलांचे डोळे हरणासारखे सुरेख असतात त्या आपल्या कुटुंबासाठी खूप नशीबवान असतात. अशा कुटुंबातील लोक नेहमी प्रेमळ आणि आनंदाने राहतात. हरणांसारख्या डोळ्यांबरोबकच डोळ्याच्या कोपऱ्यातील भाग लाल असेल तर त्या कुटुंबाकडे खूप धन संपत्ती असते.