सौभाग्यवान असतात अशा महिला ज्यांना मिळतात असे पती, स्वर्ग सुख मिळवतात

आध्यात्म
Updated Sep 02, 2022 | 12:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

चांगले आणि गुणी पती मिळण ही सौभाग्याची गोष्ट असते. विदुर नितीमध्ये अशा महिलांना खूप भाग्यवान म्हटले आहे. 

couples
सौभाग्यवान असतात अशा महिला ज्यांना मिळतात असे पती 
थोडं पण कामाचं
  • विदुर नितीनुसार परोपकारी व्यक्तीचा सन्मान हा धरतीपासून ते स्वर्गापर्यंत होतो.
  • इमानदार असणे व्यक्तीचा उत्तम गुण असतो. अशा चरित्रवान व्यक्ती संपूर्ण कुटुंबान मान-सन्मान मिळवतो.
  • जी व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच दान-धर्म करते अशा व्यक्तीचे पुण्य अधिक पटीने वाढते.

मुंबई: महाराज विदुर(maharaj vidur) हे महाभारत कालाच्या प्रमुख पात्रांपैकी एक आहेत. ते महान राजनीतिज्ञ, विवेकशील आणि बुद्धिमान होते. त्यांच्या बनवलेल्या नितीमुळे जीवन सफल होण्यास मदत होते. महात्मा विदुर यांच्या निती या विदुर निती नावाने ओळखल्या जातात आणि यात जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. विदुर नितीमध्ये उत्तम पुरुषाची लक्षणे सांगितली आहेत आणि सांगितले आहे की असा पती मिळणाऱ्या महिला खूपच भाग्यवान असतात. जाणून घेऊया चांगल्या पतीची लक्षणेThis women are very lucky to have this type of husband

अधिक वाचा - Tech: ऑक्टोबरपासून 'या' स्मार्टफोनमध्ये WhatsApp चालणार नाही

परोपकारी - विदुर नितीनुसार परोपकारी व्यक्तीचा सन्मान हा धरतीपासून ते स्वर्गापर्यंत होतो. अशा व्यक्तीला नेहमी मान-सन्मान मिळतो. तसेच या व्यक्तीच्या चांगल्या कर्माची ख्याती सगळीकडे असते. असा पती असणाऱ्या महिला अतिशय भाग्यवान असतात. 

इमानदार आणि चरित्रवान - इमानदार असणे व्यक्तीचा उत्तम गुण असतो. अशा चरित्रवान व्यक्ती संपूर्ण कुटुंबान मान-सन्मान मिळवतो. त्यांची मुलेही त्यांचे अनुकरण करतात आणि संस्कारी तसेच इमानदार बनतात. ज्या महिलाांना असा पती आणि मुले असतात त्यांचे जीवन नेहमी आनंदी राहते.

अधिक वाचा - सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये असतात 'या' खास गोष्ट

धार्मिक आणि दानवीर

धन दान करणे हे सगळ्यात चांगले मानले गेले आहे. जी व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच दान-धर्म करते अशा व्यक्तीचे पुण्य अधिक पटीने वाढते. या व्यक्तीवर नेहमी देवाची कृपा राहते. तसेच सुख-समृद्धीची कमतरता भासत नाही. अशा पद्धतीचे पुरुष महिलेच्या आयुष्यात आल्यास त्या महिलेचे आयुष्य दुपटीने सुखकर होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी