Gayatri Jayanti 2022 Date, Puja Vidhi । मुंबई : हिंदू धर्मामध्ये माता गायत्रीला हिंदू भारतीय संस्कृतीची जन्मदात्री मानली जाते. हिंदू पंचागानुसार, गायत्री जयंती हा उत्सव दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. या तिथीला वेदांची माता वेद माता गायत्रीचा जन्म झाला होता असे म्हणतात. मात्र गायत्री जयंतीबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काही लोक हा फक्त गंगा दसरा मानतात. त्याचबरोबर काही लोक दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला गायत्री जयंती साजरी करतात. (This year is Gayatri Jayanti on this day, Know the date and the right moment of worship).
जे लोक जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला गायत्री जयंती साजरी करणार आहेत. त्यांच्यासाठी हिंदू दिनदर्शिकेनुसार, यंदा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ११ जून रोजी शनिवारी येत आहे. या दिवशी निर्जला एकादशी देखील आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी लोक पाणी न पिता उपवास करतात आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात.
अधिक वाचा : या लोकांच्या घरातील तिजोरीत नेहमीच असते भरभराट
गायत्री जयंतीच्या दिवशी भक्तांनी पहाटे लवकर उठून स्नान वगैरे आटोपून घरी पूजास्थळी बसावे. त्यानंतर माता गायत्रीची मूर्ती पूजास्थानी स्थापित करून गंगाजलाने पवित्र करावी. आता शुद्ध झाल्यावर माता गायत्रीला अक्षता, फुले, मिठाई, चंदन इत्यादी अर्पण करावे. त्यानंतर धूप-दीप लावावा. आता गायत्री मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा. शेवटी गायत्री चालीसा व आरती वाचावी. शेवटी विसर्जन करताना हात जोडून नमस्कार करावा. सर्वांना प्रसादाचे वाटप करा.