Ganga Dussehra 2022 Date । मुंबई : ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला गंगा दसरा साजरा करण्याची परंपरा आहे. शास्त्रानुसार या दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती. म्हणूनच या शुभ तिथीला गंगा नदीत पवित्र स्नान केल्याने १० प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. दरम्यान यावेळी ९ जून रोजी गंगा दसरा साजरा होणार असून या दिवशी चार शुभ योगायोग देखील घडत आहेत. (This year is on this day Ganga Dussehra, know bath-giving and auspicious moments).
हिंदू धर्मात गंगा दसऱ्याचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. गंगा दसर्याच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांच्या भेटीमुळे चार शुभ योग तयार होत असल्याचे ज्योतिष तज्ज्ञ सांगतात. याकाळात गुरू-चंद्र आणि मंगळाचा दृष्टी संबंध राहील. यामुळे गज केसरी आणि महालक्ष्मी योग तयार होईल. तसेच वृषभ राशीमध्ये सूर्य-बुधाचा संयोग बुधादित्य योग तयार करेल. याशिवाय सूर्य आणि चंद्राच्या राशीतून दिवसभर रवि योग राहील. या शुभकाळात दान स्नानाचे महत्त्व अधिकच वाढेल.
अधिक वाचा : भक्तांकडे पेसै नसल्याने 'सम्राट पृथ्वीराज' फ्लॉप - KRK
गंगा दसरा, ज्येष्ठ महिना, शुक्ल पक्ष, दशमी तिथी, हस्त नक्षत्र, व्यतिपात योग, गर करण आणि कन्यास्थ चंद्र या दिवशी होणार असल्याचे देखील ज्योतिषी सांगत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी हस्त नक्षत्रात गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. त्यामुळे हस्त नक्षत्रातील पूजा आणि शुभ कार्य पूर्णत: यशस्वी मानले जाते. गंगा दसर्यावरील हस्त नक्षत्र पहाटे ४.२६ पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी याची समाप्त होईल.
गंगा दसऱ्याची दहावी तिथी गुरुवारी ९ जून २०२२ रोजी सकाळी ८.२३ ते शुक्रवार १० जून रोजी सकाळी ७.२७ पर्यंत असेल. दरम्यान शुभ मुहूर्त पाहून तुम्ही कधीही श्रद्धेने स्नान करू शकता. गंगा तीरावर जाऊन स्नान करणे शक्य नसेल तर बादलीत गंगेचे पाणी मिसळून देखील तुम्ही स्नान करू शकता.
डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.