Raksha Bandhan 2022: यंदा या दिवशी येत आहे रक्षाबंधन; जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

आध्यात्म
Updated Jun 06, 2022 | 13:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Raksha Bandhan 2022 । दरवर्षी रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रक्षाबंधनाचा सण वर्षानुवर्षे चालत आला आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे आणि प्रेमाचे प्रतिक आहे.

This year is on this day Raksha Bandhan, Know the date, auspicious moment and significance
यंदा या दिवशी येत आहे रक्षाबंधन, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दरवर्षी रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.
  • हा सण भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे आणि प्रेमाचे प्रतिक आहे.
  • २०२२ मध्ये रक्षाबंधनाचा सण गुरूवारी ११ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.

Raksha Bandhan 2022 । मुंबई : दरवर्षी रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रक्षाबंधनाचा सण वर्षानुवर्षे चालत आला आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे आणि प्रेमाचे प्रतिक आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर रक्षणाचा धागा अर्थात राखी बांधतात आणि आपल्या भावाचे प्रत्येक संकटापासून रक्षण व्हावे अशी इच्छा व्यक्त करतात. तसोच भाऊ त्यांच्या बहिणीला वचन देतात की ते सर्व संकटांपासून तिचे रक्षण करतील. चला तर म जाणून घेऊया रक्षाबंधनाची तिथी आणि शुभ मुहूर्त. (This year is on this day Raksha Bandhan, Know the date, auspicious moment and significance). 

अधिक वाचा : UPSC परीक्षेत सामान्य कुटुंबातील मुलांची असामान्य कामगिरी

 रक्षाबंधनाची तिथी आणि शुभ मुहूर्त

पंचांगानुसार यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये रक्षाबंधनाचा सण गुरूवारी ११ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. पौर्णिमा तिथी ११ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३८ पासून सुरू होईल. तर शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ७.०५ वाजता पौर्णिमा समाप्त होईल. त्यामुळे ११ ऑगस्ट गुरुवारी सकाळी ८.५१ ते  रात्री ९.१७ पर्यंत रक्षाबंधनासाठी शुभ मुहूर्त असेल. तसेच रक्षाबंधनासाठी १२ वाजल्यानंतरची वेळ - ५.१७ ते संध्याकाळी ६.१८ पर्यंत.

रक्षाबंधनाचे महत्त्व 

हा सण भाऊ-बहिणीच्या खऱ्या भावनांचे प्रतीक आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याला अधिक घट्ट करत असतो. या दिवशी बहिण आपल्या भावांच्या हातावर राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्ध भविष्यासाठी प्रार्थना करतात.

रक्षाबंधनाच्या पूजेची पद्धत 

भावाला राखी बांधण्यासाठी कुंकू, हळद, अक्षता, राखीसोबत मिठाई, कलशात पाणी आणि आरतीसाठी पणती लावावी. भावाला टिक्का लावून, उजव्या हातात संरक्षक दोरा अर्थात राखी बांधून भावाची आरती करून ओवळावे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी