Shani jayanti 2022: या दिवशी आहे शनि जयंती; शनिच्या साडेसातीपासून हा उपाय करेल सुटका 

आध्यात्म
Updated May 24, 2022 | 11:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shani jayanti 2022 । ३० मे रोजी शनि जयंती आहे. शनि जयंती म्हणजे अर्थातच शनिदेवाचा जन्मदिवस. ज्येष्ठ कृष्ण अमावस्येला शनिदेवाचा जन्म झाला.

This year Shani Jayanti is on 30th May
शनिच्या साडेसातीपासून हा उपाय करेल सुटका, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ३० मे रोजी शनि जयंती आहे.
  • ज्येष्ठ कृष्ण अमावस्येला शनिदेवाचा जन्म झाला.
  • या दिवशी केलेले उपाय शनिची साडेसाती आणि शनि धैया या राशींसाठी विशेष मानले जातात.

Shani jayanti 2022 । मुंबई : ३० मे रोजी शनि जयंती आहे. शनि जयंती म्हणजे अर्थातच शनिदेवाचा जन्मदिवस. ज्येष्ठ कृष्ण अमावस्येला शनिदेवाचा जन्म झाला. या दिवशी केलेले उपाय शनिची साडेसाती आणि शनी ढैय्या या राशींसाठी विशेष मानले जातात. यावर्षी या खास दिवशी शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत, त्यामुळे शनिच्या या बदलामुळे अनेक राशींची साडेसाची संपली आहे आणि काही राशींच्या साडेसातीला सुरूवात झाली आहे. ज्या राशींवर शनिची साडेसाती सुरू झाली आहे, त्यांनी शनि जयंतीच्या दिवशी काही उपाय केल्याने त्यांची या साडेसातीतून सुटका होऊ शकते. (This year Shani Jayanti is on 30th May). 

अधिक वाचा : बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल

शनि जयंतीच्या दिवशी "ओम शनिश्चराय नमः"

ओम नीलांजन समभसम रविपुत्रम् यमग्रजम्।

छायामार्तंड सम्भूतं तमह नमामि शनेश्चरम् |

या मंत्राचा जप शनि जयंतीच्या दिवशी करणे खूप चांगले आणि शुभ मानले जाते.

शनि जयंतीच्या दिवशी शनि चालिसाचे पठण करणेही खूप फलदायी मानले जाते. शनि जयंतीला चालीसाचे पठण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात असे म्हणतात. धार्मिक मान्यतांनुसार जे लोक दान करतात त्यांच्यावर शनिदेव प्रसन्न होतात. दान केल्याने अनेक पटींनी फळ मिळते.

दान-धर्म करावा

शनि जयंतीच्या दिवशी शनीची साडेसाती असलेल्या लोकांनी नेहमी गोर- गरिबांना मदत करावी, कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये. सर्वांच्या हितासाठी काम केले पाहिजे. तसेच समाजातील गरीब व्यक्तींना दान-धर्म करावा, यामध्ये अन्न, कपडे अशा काही गरजू वस्तूंचा समावेश असणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी