Shrawan Mahina 2022 Date। मुंबई : यंदा श्रावण महिना १४ जुलै पासून सुरू होत आहे आणि १२ ऑगस्टला संपणार आहे. यावेळी श्रावण महिन्यात ४ सोमवार असतील. पहिला सोमवार १८ जुलै, दुसरा सोमवार २५ जुलै, तिसरा सोमवार १ ऑगस्ट आणि चौथा सोमवार ८ ऑगस्टला असेल. श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारच्या दिवसाला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की सोमवारी जो व्यक्ती भगवान शंकराची विधिवत पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला तर म जाणून घेऊया श्रावण महिन्यात कोणत्या ३ राशींवर भगवान शंकराची विशेष कृपा असेल. (This year Shravan month will be between 14th July to 12th August).
अधिक वाचा : सिद्धू मूसेवालाचा मारेकरी संतोष जाधवला पुणे पोलिसांकडून अटक
श्रावण महिना भगवान शंकर यांना खूप प्रिय आहे. यामुळेच या काळात केलेली महादेवाची पूजा विशेष फलदायी असते. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. खासकरून श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे म्हणतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.