Zodiac sign: सासरी या ४ राशींच्या मुलींचा राहतो दबदबा, पतीला ठेवतात कंट्रोलमध्ये 

आध्यात्म
Updated Mar 31, 2022 | 13:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dominating Girls Zodiac Sign:ज्योतिषशास्त्रात अशा चार राशींबद्दल सांगितले आहे ज्यात या राशीच्या मुली लग्नानंतर आपल्या सासरी राज्य करतात. या राशीच्या मुलींचे पती त्यांच्या कंट्रोलमध्ये असतात. 

girl
सासरी या राशींच्या मुलींचा दबदबा, पतीला ठेवतात कंट्रोलमध्ये 
थोडं पण कामाचं
  • या राशींच्या मुली पतीला ठेवतात कंट्रोलमध्ये
  • या राशीच्या मुलींचा सासरी राहतो दबदबा
  • या राशींच्या मुलींना मिळतो मनासारखा नवरा

Dominating Girls Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रात(astrology) एकूण १२ राशी आणि ९ ग्रहांबद्दल माहिती देण्यात आली आहे. ज्योतिषानुसार व्यक्तीचा स्वभाव, त्याचे गुण आणि भविष्यावर राशींचा तसेच स्वामी ग्रहाचा सर्वाधिक प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रात अशा चार राशींची(zodiac sign) माहिती देण्यात आली आहे यात या जन्मलेल्या मुली स्वभावाने हुशार असतात. अशा मुली आपल्या जीवनात मोठे ध्येय गाठतात. तसेच करिअरमध्येही मोठे यश मिळवतात. अशा मुली लग्नानंतर(marriage) आपला पती आणि सासरच्या घरी हुकूमत गाजवतात. तसेच आपल्या  कंट्रोलमध्ये ठेवतात. This zodiac sign girl make control on there husband

अधिक वाचा - गुढी पाडवानिमित्त युनिक रांगोळी डिझाईन्सचे व्हिडिओ

या राशीमध्ये जन्मलेल्या मुलींचा सासरी राहतो दबदबा

मेष राशी

या राशीमध्ये जन्मलेल्या मुली खूप सुंदर असतात. मात्र यांचा स्वभाव खूप डॉमिनेटिंग असतो. प्रत्येकाला आपल्या तालावर कसे नाचवायचे हे या मुलींना बरोबर माहीत असते. यांचा स्वभाव आणि सुंदरता लोकांना यांच्याकडे आकर्षित करतो. मेष राशीमध्ये जन्मलेल्यया मुली लव्ह मॅरेज करतात. लग्नानंतर या मुली आपल्या नवऱ्याला पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवतात. 

कन्या राशी

या राशीच्या मुली ज्या व्यक्तीशी लग्न करतात त्या खूप भाग्यवान असतात. कन्या राशीच्या मुली खुल्या विचारांच्या असतात. दरम्यान लग्नानंतर या चांगली पत्नी सिद्ध होतात. या प्रत्येक परिस्थितीत आपल्या पतीला पूर्ण निष्ठेने साथ देतात. त्यामुळे सासरीही यांचा दबदबा राहतो. 

वृश्चिक राशी

या राशीच्या मुलींना बंदिस्त जगायला आवडत नाही. या आपल्या स्वातंत्र्याच्या दुनियेत कोणाला येऊ देत नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या मुली ज्या व्यक्तीशी लग्न करतात त्यांचे घर आनंदाने भरून जाते. 

अधिक वाचा- Mohammed Shami ची चाहती बनली ही पॉर्नस्टार

मकर राशी

मकर राशीमध्ये जन्मलेल्या मुली आपल्या सासरी राज्य करतात. त्यांना कोणत्याही कामात बेपर्वाई पसंत नाही. याच कारणामुळे सासरचे लोक यांचा खूप सन्मान करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी