Zodiac Signs: अगदी सहज ब्रेकअप करतात या राशीचे लोक

आध्यात्म
Updated Jun 21, 2022 | 14:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Zodiac Sign personality: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीनुसार व्यक्तीची पर्सनॅलिटी सांगण्यात आली आहे. यानुसार काही जण आपल्या जोडीदाराप्रती अतिशय प्रामाणिक असतात तर काहीजण अगदी सहजतेने ब्रेकअप करतात. 

partner
Zodiac Signs: अगदी सहज ब्रेकअप करतात या राशीचे लोक 
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रानुसार ३ राशींच्या लोकांच्या जीवनात रिलेशनशिप स्टेटस बदलत राहते.
  • हे लोक एका पार्टनरसोबत राहू शकत नाही.
  • विविध कारणांमुळे यांचे सतत ब्रेकअप होत असते.

मुंबई: प्रेम(love) हे जीवनासाठी गरजेचे असते. ज्या लोकांना आपल्या जोडीदाराची(partner) प्रेमळ साथ मिळते ते खूप लकी असतात. दरम्यान, प्रेमळ जोडीदाराची साथ मिळणे अथवा खरे प्रेम लाभणे हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. काही लोकांच्या लव्ह लाईफमध्ये(love life) तर स्थिरता नसते. ते सतत पार्टनर बदलत असतात. त्यांच्यासाठी ब्रेकअप करणे आणि नवा पार्टनर शोधणे कठीण काम नसते. ते सहजतेने आपले पार्टनर बदलतात. This zodiac sign people break up easily

अधिक वाचा- धर्मवीर चित्रपटापासून बिघडले ठाकरे आणि शिंदेंचे संबंध

बदलत राहते रिलेशनशिप स्टेटस

ज्योतिषशास्त्रानुसार ३ राशींच्या लोकांच्या जीवनात रिलेशनशिप स्टेटस बदलत राहते. हे लोक एका पार्टनरसोबत राहू शकत नाही. विविध कारणांमुळे यांचे सतत ब्रेकअप होत असते. मात्र लवकरच हे नवा पार्टनरही शोधता. 

मेष रास

मेष राशीच्या व्यक्तीच्या नाकावरच राग असतो. अनेकदा या लक्षही देत नाहीत की ते काय बोलत आहेत? त्यांच्या याच अवगुणामुळे त्यांच्या नात्यात अडथळा निर्माण होतो आणि लवकरच त्यांचा ब्रेकअप होतो. दरम्यान, या खूप समजूतदारही असतात आणि नाते बिघडत असल्यास स्वत:च पार्टनरपासून दूर जातात. 

तूळ रास

तूळ राशीच्या व्यक्ती अनेक बाबतीत संतुलित असतात. मात्र सोबतच त्या खूप इमोशनलही असतात. त्यांचे प्रमाणापेक्षा जास्त इमोशनल असणे तसेच लहान लहान गोष्टी मनाला लावून घेणे यामुळे त्या जोडीदारापासून दूर जातात. या कारणांमुळे त्यांचा लवकर ब्रेकअप होतो. साधारणपणे पार्टनरसोबत वाद घालणे अथवा नात्यात कडवटपणा येण्याआधीच ते दूर होतात.

अधिक वाचा - शिवसेनेच्या बंडखोरीनंतर भाजप ऍक्शन मोडमध्ये

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या व्यक्ती तसे थोडेसे स्वार्थी असतात. मात्र रिलेशनशिपमध्ये ते आपला स्वभाव बदलतात. ते नाते निभावण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. मात्र जेव्हा पार्टनरशी जुळतच नाही तेव्हा त्याला सोडण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. यांना नात्यात कडवटपणा आवडत नाही आणि लवकरच त्या दुसरा पार्टनर शोधतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी