Mangal Gochar 2022: या राशीच्या व्यक्तींसाठी येणारे ४० दिवस विशेष फलदायी

आध्यात्म
Updated May 17, 2022 | 12:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mars Transit 2022: कोणत्याही राशीचे गोचर हे अन्य राशींच्या व्यक्तींच्या जीवनावर विशेष प्रभाव टाकते. आता १७ मेला मंगळ ग्रह मीन राशीमध्ये गोचर करणार आहेत. जाणून घ्या कोणत्या राशींना होणार लाभ...

astrology
या राशीच्या व्यक्तींसाठी येणारे ४० दिवस विशेष फलदायी 
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रानुसार मंगळचे गोचर या राशीच्या अकराव्या स्थानावर होत आहे.
  • मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी हे परिवर्तन शुभ असेल
  • कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हे परिवर्तन अतिशय लाभदायक ठरणार आहे. या

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार(astrology) १७ मे २०२२, मंगळवारच्या दिवशी मंगळ ग्रह(mars transist) कुंभ राशीतून निघून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि २७ जूनपर्यंत मीन राशीमध्ये राहणार आहेत. मंगळ ग्रहाचे गोचर अनेक राशींसाठी विशेष फलदायी सिद्ध होणार आहे. मीन राशीचे देवगुरू बृहस्पती आधीपासूनच विराजमान आहेत. याचे फलस्वरूप मंगळची ही युती मंगल गुरू योग निर्माण करेल. जाणून घ्या राशींवरील याचा प्रभाव...this zodiac sign people will get benefit in next 40 days

अधिक वाचा - सर्व्हे रिपोर्ट सादर करण्यास आयुक्तांनी मागितला वेळ

मंगळ गोचरचा राशींवर काय प्रभाव होईल

वृषभ राशी - ज्योतिषशास्त्रानुसार मंगळचे गोचर या राशीच्या अकराव्या स्थानावर होत आहे. येथे आधीपासूनच गुरू देव विराजमान आहेत. त्यामुळे हे परिवर्तन या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नाचे विविध स्त्रोत निर्माण होतील.. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल तसेच भविष्याच्या योजनांमधून लाभ मिळेल. व्यापाऱ्यांना मेहनतीचे शुभ फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. पोटासंबंधित त्रास सतावू शकतात. 

मिथुन राशी - मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी हे परिवर्तन शुभ असेल. याच्या दहाव्या भागात मंगळाचे परिवर्तन होत आहे आणि येथे आधीपासूनच गुरूदेव आहेत. याच कारणामुळे येथे मंगळ गुरू योग निर्माण होत आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी हे अत्यंत शुभ असणार आहे. या कालावधीत मान-सन्मान वाढेल, कामाच्या ठिकाणी दबदबा राहील. इतकंच नव्हे तर या कालावधीत जमीन, घर खरेदीचे योग बनत आहेत. या दरम्यान घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. 

कर्क राशी - या राशीच्या व्यक्तींसाठी हे परिवर्तन अतिशय लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान मानसिक शांतता लाभेल. नोकरी आणि व्यापारात दबदबा कायम राहील. या कालावधीत उर्जावान राहतील. जास्त मेहनत करतील. ज्याचे सकाराकत्मक परिणाम दिसून येतील. या दरम्यान विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. धार्मिक यात्रेवर जाल. 

अधिक वाचा - वारंवार पोट फुगण्याच्या समस्येवर रामबाण उपाय, वाचा सविस्तर

तूळ राशी - तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हे परिवर्तन मिळते-जुळते राहील. या कालावधीत तुमच्या व्यक्तीमत्वात सकारात्मकता येईल. भाग्याची साथ लाभल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. कला क्षेत्राशी संबधित लोकांना विशेष फायदा होईल. या दरम्यान कोणतीही चुकीची कामे करू नका. नाहीतर कोर्ट-कचेरीची कामे करावी लागतील. वाहन  चालवताना सावधानता बाळगा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी