मुंबई: पैशांमध्ये खेळणे आणि त्यात जगायला कोणाला आवडत नाही. मात्र ज्यांना पैशाची कदर असते त्यांच्याकडे पैसा-संपत्ती(money) टिकते. काही लोक विचार न करता खूप पैसा खर्च करतात. ज्योतिषशास्त्रात अशा ५ राशींबद्दल सांगितले आहे जे पाण्याप्रमाणे पैसा खर्च करतात. ज्योतिषशास्त्रात असेही सांगितले आहे की जे लक्ष्मीची कदर करतात त्यांच्याचकडे लक्ष्मी टिकते. जाणून घेऊया अशा लोकांबद्दल...This zodiac sign peoples always spent so much money
अधिक वाचा - घटस्फोटानंतर या हिरोईनच्या प्रेमात नागा चैतन्य
वृषभ रास- ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे स्वामी शुक्र ग्रह आहेत. त्यांना ऐशोआरामात जगणे आणि भौतिक सुख भोगणे खूप आवडते. बेहिशोबी पैसा खर्चक केल्यामुळे यांच्याकडे जास्त पैसे वाचत नाहीत. जर हे एखादी गोष्ट खरेदी करण्याचा विचार केला तर ते खरेदी करतात. अशी खरेदी करताना ते आपल्या बजेटमध्ये बसेल की नाही याचा विचार करत नाही. त्यामुळेच यांच्याकडे पैसा टिकत नाही.
मिथुन रास - या राशीच्या व्यक्ती खूप शौकीन असतात. या आपल्या मित्रपरिवारावर खूप पैसा खर्च करतात. दिखावा करण्याच्या नादात आपले सगळे पैसे संपवतात आणि थोडीही बचत करू शकत नाहीत. बुध ग्रह या राशीचा स्वामी मानला जातो. यासाठी हे लोक आपली बुद्धिमत्ता आणि चतुराईने खूप धन कमावतात. मात्र यांचा स्वभाव खर्चाळू असल्याने बचत करू शकत नाही.
सिंह रास - ज्योतिषशास्त्रानुसार या राशीवर सूर्य देवाची कृपा राहते. यांना लक्झरी लाईफस्टाईलचा शौक असतो. इतकंच नव्हे तर शौकही मोठे शाही असतात. हे लोक आपल्या सुख-सुविधेसाठी पाण्याप्रमाणे पैसा खर्च करतात. महागड्या गोष्टी खरेदी करत असल्याने थोडाही पैसा साठवू शकत नाहीत.
तूळ रास - या राशीचा स्वामी शुक्र ग्रह मानला जातो. या राशीच्या लोकांना एकीकडे हा ग्रह धन-दौलत प्रदान करण्यास मदत करते दुसरीकडे यांना खर्च करायलाही भाग पाडतो. हे लोक आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्यांवर जास्त पैसे खर्च करतात. याच कारणामुळे हे लोक पैशांची बचत करू शकत नाही. हे लोक धन बचत करू शकत नाही. यांना आज जगण्यावर विश्वास असतो. यांना भविष्याची अजिबात चिंता नसते.
अधिक वाचा - Dark Underarms मुळे Sleeveless घालणं मुश्किल, मग करा हे उपाय
कुंभ रास - या राशीवर शनीचा प्रभाव पाहायला मिळतो. हे लोक खोटी शान दाखवणारे मानले जातात. समाजात आपला दिखावा करण्यासाठी तसेच नाक उंच राखण्यासाठी पैसा पाण्याप्रमाणे वाहवतात. यांच्याकडे थोडाजरी पैसा आला तरी खर्च सुरू करतात.