नवी दिल्ली : महाराष्ट्रात (Maharashtra) श्रावण (Shravan) उत्तर भारतातील सुरू झालेल्या श्रावणाच्या १५ दिवसांनी सुरू होत असतो. महाराष्ट्रात २९ जुलै २०२२ पासून भगवान (God) शिव-शंकराच्या (Shiva-Sankara) उपासनेचा (Worship) महिना श्रावण सुरू होणार आहे. श्रावणात मांस (meat) व मद्य सोडून सात्विक आहार (Sattvic diet) घेतला जातो. तर उत्तर भारतात आजच्या दिवशी हरियाली अमावस्या म्हणून ओळखली जाते.
मराठी दिनदर्शिकेनुसार गटारी अमावस्या आषाढ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. श्रावण महिन्यात पुढील ४० दिवस मद्यपान व मांसाहार वर्ज्य केला जातो. पंचांगानुसार मराठी महिन्यात आषाढी अमावस्या हा शेवटचा दिवस असतो ज्या दिवशी बहुतेकजण मांसाहार आणि मद्यपान करतात. त्यामुळे याला गटारी अमावस्या (Gatari Amavashya) म्हणतात. यावेळी गटारी अमावस्या २८ जुलै म्हणजे आज आहे. उद्यापासून महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात होते. आज गटारी आमवस्या आहे, या आमवस्येला मांसाहार का केला जातो आणि गटारी हे नाव का पडलं हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. गटारी म्हणजे मज्जा, मस्ती, भरपेट मांसाहार आणि मदिरापान, अर्थात दारू पिणं. पण गटारी म्हणजे फक्त एवढंच असतं का? आणि मुळात गटारी आणि गटार यांचा काही संबंध असतो, की नसतो हेच आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसतं.
गतहारी अमावस्या म्हणजे गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला हा शब्द म्हणजे गताहार. गत म्हणजे गेलेला, म्हणजेच गताहारचा अर्थ होतो गेलेला/त्यागलेला आहार.यावरुन याला गटारी अमावस्या असे नाव पडले आहे. गतहारी शब्दाचा अपभ्रंश होऊन गटारी झाला आहे.
Read Also : 3-0 ने मालिका जिंकत भारताचा वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश
श्रावण महिन्यात दारू, मांसाहार या गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. म्हणजेच श्रावण महिन्यात आपण यातील काहीही खात नाही. थोडक्यात काय, तर हा आहार गेलेला असतो. म्हणून श्रावण सुरु होण्याच्या आधीची म्हणजेच आषाढाची अमावस्या गताहारी, साजरी केली जाते आणि पुढच्या महिन्याभरात जे जेवण त्यागायचं आहे, ते भोजन यादिवशी केलं जातं. जसे की, मांसाहार, अल्कोहोलयुक्त पेये आणि कांदा आणि लसूण यांसारखे तामसिक पदार्थ कटाक्षाने टाळतात. त्यामुळे श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी लोक मांसाहार करून श्रावणातील सर्व प्रथा पाळण्यासाठी सज्ज होतात. त्यामुळे महाराष्ट्रात गटारी अमावास्या साजरी केली जाते. याच दिवशी दीप आमावस्या देखील आहे. संध्याकाळी दिव्याचे पूजन करून घराच्या अवती भवती दिवे लावून अनेक जण दीप अमावस्या साजरी करतात.
Read Also : पुण्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची ईडीकडून चौकशी
श्रावण महिणा लागण्याआधीच मासांहारी लोक गटारी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गटारीच्या दिवशी, लोक जवळचे मित्र आणि प्रियजनांसह स्वादिष्ट मांसाहारी पदार्थाचा आस्वाद घेतात कारण श्रावण सुरु झाल्यानंतर चिकन मटण खाणे चुकीचे मानले जाते. कारण पावसाळ्यात येणाऱ्या श्रावण महिन्यात आजारांचा धोका जास्त असतो. त्यामुळे लोक हलके अन्न खाण्यास प्राधान्य देतात. गटारी सणाच्या दिवशी, कुटुंबे दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मेजवाणीचा आनंद घेण्यासाठी एकमेकांच्या घरी जातात. श्रावणमध्ये वेगवेगळ्या पूजा, व्रत आणि उपवास केले जातात. गटारीचा अर्थ अमर्यादपणे सेवन करणे असे केले जाते. त्यामुळे तुम्ही गटारी अमावस्येला पोट भरून खाऊ शकता.
Read Also : एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर
चातुर्मासातील पहिली आणि आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावास्येला दीप अमावस्या म्हणतात. श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्य येत असल्याने सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते. भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्येदिवशी पूजा केली जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि दिवा लावला जातो. दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे.
कृष्ण पक्ष अमावस्या तिथीची सुरुवात - २७ जुलै रोजी रात्री ०९: १२ वा
कृष्ण पक्ष अमावस्या समाप्त- २८ जुलाई रात ११ वाजून २४ मिनिटापर्यंत