Sharad Purnima 2020: आज आहे कोजागिरी पोर्णिमा, जाणून घ्या पुजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

आध्यात्म
Updated Oct 30, 2020 | 13:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

kojagari pournima: शरद पोर्णिमा म्हणजेच कोजागिरी पोर्णिमा अश्विन मासातील शुक्ल पक्षाच्या पोर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मी मातेची भक्तिभावाने पुजा केली जाते. 

sharad pournima
आज कोजागिरी पोर्णिमा,जाणून घ्या पुजेचा शुभ मुहूर्त आणि महत्व 

थोडं पण कामाचं

  • कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री खासकरून खीर बनवली जाते.
  • या दिवशी लक्ष्मी मातेची पुजा केली जाते.
  • भक्ती भावाने लक्ष्मी मातेची पुजा अर्चा करतात त्यांच्यावर लक्ष्मी देवीची कृपा कायम राहते. 

मुंबई: सर्व पोर्णिमांमध्ये विशेष मानली जाणारी शरद पोर्णिमेचे(sharad pournima 2020) पर्व आज आहे. शरद पोर्णिमेला अश्विन मासातील शुक्ल पक्षाच्या पोर्णिमेला साजरी केली जाते. या पोर्णिमेला कोजागिरी पोर्णिमाही(kojagari pournima) म्हणतात. या दिवशी लक्ष्मी मातेची(laxmi mata) भक्ती भावाने पुजा करतात. जे भक्तगण भक्ती भावाने लक्ष्मी मातेची पुजा अर्चा करतात त्यांच्यावर लक्ष्मी देवीची कृपा कायम राहते. 

असं म्हटलं जात की शरद पोर्णिमेच्या रात्री चंद्र सोळा कलांनी युक्त असतो. शास्त्रानुसार शरद पोर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणाऱ्या किरणांमध्ये सर्व रोगांचा नाश करण्याची क्षमता असते. याच कारणामुळे म्हटले जाते की शरद पोर्णिमेच्या रात्री अमृत वर्षा होते. अशीही मान्यता आहे की शरद पोर्णिमेच्या दिवशी चंद्र, पृथ्वीपासून खूप जवळ असतो. यादरम्यान अंतराळातील सर्व ग्रहांमधून निघणारी पॉझिटिव्ह एनर्जी चंद्राच्या किरणांनी सरळ पृथ्वीवर पोहोचते. 

शरद पोर्णिमेच्या रात्री बनवली जाते खीर

शरद पोर्णिमा म्हणजेच कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी खासकरून खीर बनवली जाते. ही खीर रिकाम्या आकाशाखाली ठेवली जाते. यामागचे वैज्ञानिक कारण म्हणजे चंद्राचे औषधीय गुणांनी युक्त किरणे पडल्याने खीर अमृतासमान होते. याचे सेवन करणे लाभदायक मानले जाते. याशिवाय असा तर्कही आहे की दुधात लॅक्टिक अॅसिड असते जे चंद्राच्या किरणांनी अधिक मात्रेतील शक्ती शोषतात आणि भातात स्टार्च असल्याने ही प्रक्रिया आणखी सोपी होते. वैज्ञानिक मान्यतेनुसार ही खीर खाल्ल्याने आरोग्याच याचे खूप फायदे होतात. 

काय आहे शरद पोर्णिमेची कथा

प्राचीन कथेनुसार एका सावकाराच्या दोन मुली होत्या. या दोन मुली पोर्णिमेचे व्रत भक्तीभावाने करत असतं. एकदा मोठ्या मुलीने पोर्णिमेचे व्रत विधीपूर्वक केले मात्र छोट्या मुलीने ते व्रत करणे सोडले. या कारणामुळे छोट्या मुलीचे बाळ जन्म घेताच मृत्यू पावले. त्यानंतर सावकाराच्या मोठ्या मुलीच्या पुण्यस्पर्शाने लहान मुलीचे बाळ पुन्हा जिवंत झाले. तेव्हापासून हे व्रत विधीपूर्वक करण्याची पद्धत आहे. 

कोजागिरी पोर्णिमेचा शुभ मुहूर्त

कोजागिरी पोर्णिमेचा शुभ मुहूर्त ३० ऑक्टोबरच्या रात्री ५ वाजून ४७ मिनिटांपासून ते ३१  ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत राहील. 

अशी करा पुजा

या दिवशी लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. या दिवशी सकाळी स्नान करून एका पाटावर लाल रंगाचा कपडा पसरला. यानंतर यावर लक्ष्मी मातेच्या प्रतिमेची स्थापना करा. आता लक्ष्मी मातेची विधीवत पुजा करा. यानंतर स्त्रोताचे पठण करा. या दिवशी स्त्रोताचे पठण केल्यावर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर कायम राहते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी