Surya Grahan 2022 Updates | मुंबई : भारतातील वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी मध्यरात्री १२.१५ वाजल्यापासून सुरू होईल आणि पहाटे ४ वाजून ७ मिनिटांपर्यंत राहील. हे आशिंक सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने यावेळी सुतक काळातील नियम लागू होणार नाहीत. (Today is the first solar eclipse of the year, find out its duration and time).
दरम्यान, असे मानले जाते की सूर्यग्रहण काळात लोकांनी काही गोष्टींची विशेख काळजी घेतली पाहिजे. लक्षणीय बाब म्हणजे या काळात गर्भवती महिलांनी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी. २०२२ या वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सुतक कालावधी मानला जाणार नाही. हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि अंटार्टिकामध्ये दिसणार आहे.
अधिक वाचा : दहावीची परीक्षा देण्यासाठी आले ५८ वर्षांचे आमदार
जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येत असतो आणि त्याची पृथ्वीवर सावली पाडतो. या घटनेमुळे चंद्र सूर्याला संपूर्ण किंवा अंशत: व्यापतो. आंशिक ग्रहणादरम्यान चंद्र सूर्याला थोड्याशा प्रमाणात झाकतो.
यावेळी सूर्यग्रहणाच्या दिवशी शनिचरी आमावस्या देखील आली आहे. शनि आणि सूर्याच्या या दुर्मिळ संयोगात काही उपाय करणे फायदेशीर ठरू शकते. ज्यांनी शनीची साडेसाती आणि शनीची धैय्या यांपासून त्रास होत असेल त्यांनी सूर्यग्रहणाच्या दिवशी शनिदेवाला तेल अर्पण करावे.
शास्त्रज्ञांच्या मते, ग्रहण ही एक खगोलीय घटना असते, ग्रहणाच्या काळात ब्रम्हांडात अनेक अद्भुत घटना घडत असतात. धार्मिक ग्रंथांबद्दल भाष्य करायचे झाले तर ग्रहणाच्या काळात मानवासह देवताही संकटतात सापडतात. जेव्हा चंद्र आणि सूर्य यांच्यातील अंतर शून्य असते, म्हणजेच जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हणतात. तर जेव्हा चंद्र सूर्याला अंशतः झाकतो, म्हणजेच जेव्हा सूर्याचा काही प्रकाश पृथ्वीवर पडतो, तेव्हा त्याला आंशिक सूर्यग्रहण असे म्हणतात. तसेच जेव्हा चंद्र सूर्याच्या मध्यभागाला व्यापतो, तेव्हा या प्रकरणात सूर्य वलयासारखा दिसू लागतो या क्रियेला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.