Shravan Somvar 2022: मुंबई : आज श्रावण (Shravan 2022) महिन्यातला दुसरा सोमवार आहे. श्रावणातले सोमवार हे विशेष महत्वाचे समजले जातात. श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची पूजा करायची धार्मिक परंपरा (religious tradition) आहे. दुसऱ्या सोमवारची शिवामूठ तीळ आहे.
श्रावणी सोमवार या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असावा. ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। ‘ हा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन ह्या व्रताची समाप्ती करावी.
Read Also : नितीश कुमार भाजपची साथ सोडत काँग्रेसशी हात मिळवणी करणार
सोमवार व्रत पद्धत 2 : आणखी एका वेगळ्या प्रकारे सोमवार व्रत केले जाते. हे व्रत श्रावणाप्रमाणेच चैत्र, वैशाख, कार्तिक आणि मार्गशीर्ष ह्या महिन्यांमध्येही केले जाते. मात्र श्रावणातील सोमवारी केल्यास ते विशेष मानले जाते. पूजेआधी व्रताचा संकल्प करावा. नंतर शिवशंकरांचे ध्यान करावे. तत्पश्र्चात’ओम नम: शिवाय’ ह्या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर ‘ओम नम: शिवाय:’ या मंत्रोच्चारासह पार्वतीमातेची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. ह्या दिवशी एकभुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे. अशातऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे. श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा.
Read Also : भारताने विंडीजविरुद्धची T२० सीरिज ४-१ अशी जिंकली
संपूर्ण श्रावण महादेवाची पूजा केली जाते. पाणी आणि बेलपत्र अर्पण केले जाते. शिवलिंगावर बेलाची पाने अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होत असतात. बेलाच्या पानांच्या मुळाची पूजा केल्यानेही महादेव प्रसन्न होतात आणि दरिद्रता नष्ट होते. बेलपत्राचे झाड पूजेसोबत औषधाच्या कामात येते. शिवपुराणात सांगितले आहे की, बेलपत्राच्या मुळाची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि महादेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो. आज दुसऱ्या सोमवारी कोणत्या गोष्टींनी बेलपत्राची पूजा कशी कराल?
श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी बेलपत्राच्या रोपाला पाणी घालावे आणि नंतर बेलपत्राला गंध, धतुरा, फुले आणि अक्षदा ठेवावे. असे केल्याने घरातील मुलांचे आरोग्य बरोबर राहते आणि संतती सुख मिळते. यासोबतच कुटुंबात सुख-शांती कायम राहते.
Read Also : महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवू : CM
जर एखाद्या व्यक्तीने बेलपत्राच्या झाडाखाली शिवभक्ताला मिठाई, खीर, अन्न, पाणी, तूप इत्यादी दान केले आणि गरीब आणि गरजूंना अन्नदान केले तर महादेवाची कृपा त्याच्यावर सदैव राहते आणि दारिद्र्य नष्ट होते. त्या व्यक्तीला कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही.
बेलपत्राच्या झाडाचा उपयोग शिवपूजेसाठी तसेच औषधी कार्यात केला जातो. जर घरामध्ये एखादी व्यक्ती खूप आजारी असेल तर बेलपत्र पाण्यात कुस्करून किंवा उकळून प्यायल्याने पीडित व्यक्तीला खूप आराम मिळतो. यात रोग बरा करण्याची क्षमता देखील आहे, परंतु डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Read Also : OBC समाजाच्या समस्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू: DCM
शिवपुराणानुसार, बेलपत्राच्या झाडाला श्री वृक्ष असेही म्हणतात, ज्याच्या मुळामध्ये देवी लक्ष्मी स्वतः निवास करते. दर सोमवारी तिची पूजा केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होऊन धनवृद्धीचा आशीर्वाद मिळतो. तर बेलपत्राच्या मुळाचे पाणी रोज कपाळावर लावल्यास सर्व तीर्थांचे पुण्य लाभते.
शिवपुराणानुसार श्रावणात दररोज बेलपत्राच्या झाडाची पूजा केल्यास सर्व पापांचा नाश होतो. संपूर्ण श्रावन शक्य नसेल तर किमान दर सोमवारी पूजा करावी. असे केल्याने शिवाची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.