Utpanna Ekadashi 2021: उत्पन्ना एकादशी (Utpanna Ekadashi 2021) ला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असं म्हटलं जातं जातं की, उत्पन्ना एकादशीपासूनच एकादशीच्या (व्रत) उपवासाची सुरुवात झाली होती. याला कन्या एकादशीही म्हणूनही ओळखलं जातं. ही एकादशी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला येते. यावेळी उत्पन्ना एकादशी 2021 आज मंगळवार, 30 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.
या दिवशी भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते. या दिवशी व्रत आणि श्री हरिची पूजा केल्याने भक्तांचे दुःख दूर होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे सांगितले जाते. असं म्हटलं जातं की, एकादशीच्या दिवशी उपवास केल्यास अश्वमेध यज्ञाइतकेच फळ मिळते. इतकेच नाही तर अशीहील मान्यता आहे की, एकादशीच्या रात्री जागरण केल्याने देवाची विशेष आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. जर कोणी व्यक्ती एकादशीला उपवास किंवा व्रत ठेवण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर या उत्पन्ना एकादशीपासून ते लोक सुरू करू शकतात. असं म्हटलं जात की, राशीनुसार या एकादशीला उपाय केल्यास आयुष्यातील दु:खांचा नाश होतो. चला तर जाणून घेऊ राशीनुसार केली जाणारे काही उपाय