Guru purnima 2022 Daan:आज गुरुपौर्णिमेला होत आहेत 4 राजयोग, स्नान आणि दानासाठी आहे शुभ मुहूर्त

आध्यात्म
भरत जाधव
Updated Jul 13, 2022 | 07:56 IST

वेद व्यास हे वेदांचे लेखक मानले जातात. वेद व्यासांचा जन्म आषाढाच्या पौर्णिमेला झाला असे मानले जाते, त्यांच्या जयंतीनिमित्त गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानधर्माला खूप महत्त्व आहे. यंदा गुरुपौर्णिमा हा सण बुधवार, १३ जुलै २०२२ रोजी आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक गंगा नदी किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करतात आणि नंतर गरजू लोकांना दान देतात.

Guru purnima 2022 Daan:
Guru purnima 2022 : गुरुपौर्णिमेला होत आहेत 4 राजयोग   |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • गुरुपौर्णिमेला गुरु, मंगळ, बुध आणि शनि या ग्रहांच्या शुभ संयोगामुळे रुचक, षष्ठ, हंस आणि भद्रा नावाचे राजयोग तयार होत आहेत.
  • पंचांगानुसार १२ जुलै रोजी दुपारी २. वाजून ३५ मिनिटांनी गुरुपौर्णिमा सुरू होत आहे.
  • १४ जुलैपासून श्रावणाला सुरूवात होईल.

Guru purnima 2022 Daan Snan Time: वेद व्यास हे वेदांचे लेखक मानले जातात. वेद व्यासांचा जन्म आषाढाच्या पौर्णिमेला झाला असे मानले जाते, त्यांच्या जयंतीनिमित्त गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानधर्माला खूप महत्त्व आहे. यंदा गुरुपौर्णिमा हा सण आज बुधवारी, १३ जुलै २०२२ रोजी आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक गंगा नदी किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करतात आणि नंतर गरजू लोकांना दान देतात. यामुळे गुरूंची विशेष कृपा भक्तांवर असते. त्याच्या कुंडलीतून गुरु दोष नाहीसा होतो.

हे 4 राजयोग गुरु पौर्णिमेला करावेत

गुरुपौर्णिमेला गुरु, मंगळ, बुध आणि शनि या ग्रहांच्या शुभ संयोगामुळे रुचक, षष्ठ, हंस आणि भद्रा नावाचे राजयोग तयार होत आहेत. या राजयोगामुळे या गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूची पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीत गुरु दोष आणि पितृदोष संपतात, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच त्यांना नोकरी, करिअर आणि व्यवसायात खूप फायदा होतो. 

गुरू पौर्णिमेचा मुहूर्त 

पंचांगानुसार १२ जुलै रोजी दुपारी २. वाजून ३५ मिनिटांनी गुरुपौर्णिमा सुरू होत आहे. त्यामुळे १३ जुलै रोजी म्हणजेच आज उदय तिथीला गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. पौर्णिमा तिथी सुरू होताच गुरुपौर्णिमेचे स्नान सुरू होईल. गुरुपौर्णिमेचे स्नान - दानासाठी सूर्योदयापूर्वीपर्यंतचा शुभ काळ मानला जातो. तसेच, पौर्णिमा १३ जुलै रोजी रात्री  १२ वाजून ६ मिनिटांपर्यंत आहे. 

  • गुरु पौर्णिमेचे स्नान आणि दान: 13 जुलै रोजी पहाटे 4 वाजता सुरू होईल
  • इंद्र योग: १३ जुलै दुपारी  १२ वाजू ४५ मिनिटांपर्यंत
  • चंद्रोदय वेळ: १३ जुलै संध्याकाळ ७ वाजून २० मिनिटे 
  • भद्रकाल : १३  जुलैला सकाळी ५ वाजून ३२ मिनिटांपासून ते दुपारी ०२ वाजून ०४ मिनिटांपर्यंत असेल. 
  • राहुकाल :  १३ जुलैला दुपारी १२ वाजून  २७ मिनिटे ते  दुपारी २ वाजून १० मिनिटांपर्यंत असणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी