Zodiac sign: त्रिग्रही योग बदलणार ३ राशींचे नशीब, ५ दिवसांत बरसणार पैशांचा पाऊस!

आध्यात्म
Updated Jul 07, 2022 | 17:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Zodiac sign: जुलै २०२२मध्ये मिथुन राशीमध्ये एक महत्त्वाचा त्रिग्रही योग बनत आहे. एकाच मिथुन राशीत ३ ग्रहांची युती बनत आहे ही युती ३ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. 

zodiac sign
त्रिग्रही योग बदलणार ३ राशींचे नशीब, ५ दिवसांत बरसणार पैसा 
थोडं पण कामाचं
  • मिथुन राशीत बुध, शुक्र आणि सूर्य ग्रहाची युती त्रिग्रही योग बनवत आहे.
  • हा योग सर्व राशींवर परिणाम करणारा आहे
  • मात्र ३ राशीच्या लोकांना विशेषकरून लाभ देणार आहे.

मुंबई: ज्योतिषानुसार ग्रहांच्या राशीपरिवर्तनाशिवाय ग्रहांची युतीही राशींवर मोठा परिणाम करत असते. मिथुन राशीमध्ये यावेळेस सूर्य आणि बुध ग्रह उपस्थित आहेत लवकरच रोमान्स आणि भौतिक सुखांचा कार असलेला शुक्रही मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत बुध, शुक्र आणि सूर्य ग्रहाची युती त्रिग्रही योग बनवत आहे. हा योग सर्व राशींवर परिणाम करणारा आहे. मात्र ३ राशीच्या लोकांना विशेषकरून लाभ देणार आहे. या व्यक्तींना त्रिग्रही योग करिअरमध्ये मोठी उपलब्धी, पदोन्नती आणि पैसा देणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी ठरणार लकी...trigrahi yog will change luck of this 3 zodiac sign

अधिक वाचा - 10 वी शिकलेल्या, लहानपणी भजी विकणाऱ्या धीरूभाईंची कहाणी

त्रिग्रही योग चमकवणार या लोकांचे नशीब

शुक्र ग्रह १३ जुलैला मिथुन राशीत गोचर करणार. शुक्र गोचरसह मिथुन राशीत त्रिग्रही योग बनवत आहे. 

वृषभ रास - त्रिग्रही योग वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायक असणार आहे. खासकरून धनसंबंधित प्रकरणे सुटतील. अचानक पैसा मिळेल. अडकलेले पैसे मिळतील. एकूण मिलून अनेक पद्धतीने धन आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्न वाढू शकते. ज्या व्यक्ती मीडिया, फिल्म इंडस्ट्री अथवा मार्केटिंगशी संबंधित आहेत त्यांना नवी नोकरी मिळू शकते. मान-सन्मान वाढेल. व्यापाऱ्यांना लाभ मिळवण्याच्या संधी आहेत. 

सिंह रास - सिंह राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग इन्कममध्ये वाढ करेल. नव-नव्या पद्धतीने धनलाभ होईल. आर्थिक स्थितीत जबरदस्त सुधारणा होईल. अडकलेली काम पूर्ण होतील. करिअर-व्यापारात मोठे यश हाती लागू शकते. सन्मान-अवॉर्ड मिळू शकते.खर्चावर नियंत्रण मिळवण्यात तसेच बचत करण्यात यशस्वी व्हाल. 

अधिक वाचा - बोरिस जॉन्सन राजीनामा देणार, हंगामी पंतप्रधान होणार

कन्या रास - कन्या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये मोठे यश मिळेल. मिथुन राशीत त्रिग्रही योग त्यांना यश देईल. पगारवाढीचे पुरेपूर संकेत आहेत. व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते. ज्या लोकाचे काम परदेशाशी संबंधित आहे त्यांना मोठा फायदा मिळू शकतो. एकूण मिळून कामकाज आणि पैशाच्या हिशेबाने हा काळ चांगला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी