Tripurari Purnima 2021 Marathi Wishes: 'त्रिपुरारी पौर्णिमा', 'देव दिवाळी' आणि 'कार्तिक पौर्णिमे'च्या निमित्ताने खास Mesages Greetings

Tripurari Purnima 2021 Marathi Wishes: एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते व कार्तिक पौर्णिमेला (Kartik Purnima) विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो.

tripurari purnima 2021 wishes share special messages greetings sms images whatsapp status hd images on the occasion of tripurari purnima dev diwali and kartik purnima
'कार्तिक पौर्णिमे'च्या निमित्ताने खास संदेश   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते व कार्तिक पौर्णिमेला (Kartik Purnima) विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो.
  • कार्तिक पौर्णिमेलाचा साधारणतः त्रिपुरारी पौर्णिमा (Tripuri Purnima) किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात.
  • एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते व कार्तिक पौर्णिमेला (Kartik Purnima) विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो.

Tripurari Purnima 2021 Marathi Wishes: एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते व कार्तिक पौर्णिमेला (Kartik Purnima) विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो. याच दिवशी खऱ्या अर्थाने दिवाळी सणाची सांगता होते. कार्तिक पौर्णिमेलाचा साधारणतः त्रिपुरारी पौर्णिमा (Tripuri Purnima) किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात.


एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते व कार्तिक पौर्णिमेला (Kartik Purnima) विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो. याच दिवशी खऱ्या अर्थाने दिवाळी सणाची सांगता होते. कार्तिक पौर्णिमेलाचा साधारणतः त्रिपुरारी पौर्णिमा (Tripuri Purnima) किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या असुराचा वध केला होता, म्हणूनच हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. अनेक ठिकाणी याला ‘देव दिवाळी’ (Dev Diwali) म्हणूनही संबोधले जाते.

अशी मान्यता आहे की, या दिवशी कृतिका नक्षत्रात शंकराचे दर्शन घेतल्यास व्यक्ती सात जन्म ज्ञानी आणि धनवान होते. या दिवशी रात्री शंकराची 1008 नावे घेऊन तुळशी वाहून आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल वाहून पूजा केली जाते, या पूजेचे विशेष महत्त्व आहे. तर अशा शुभदिनी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून साजरी करा ही पौर्णिमा

देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा 

kartik purnima Marathi wishes

                                                             Kartik Purnima 2021 (Photo : BCCL)  


सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली

शब्दांचीही सुमने फुलती, येता घरोघरी देव दीपावली

देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा!

kartik purnima Marathi wishes 2

                                                             Kartik Purnima 2021 (Photo : BCCL) 


स्नेहाचा सुगंध दरवळला, देव दिवाळीचा सण आला

एकच मागणे या कार्तिक पौर्णिमेला, सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना

देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!kartik purnima Marathi wishes 4

                                                             Kartik Purnima 2021 (Photo : BCCL) 

नव्या सणाला उजळू दे आकाश

सर्वत्र पसरू दे लख्ख प्रकाश, जुळावे नवे प्रेमबंध हा एकच ध्यास

आला आज कार्तिक पौर्णिमेचा सण खास

देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

kartik purnima Marathi wishes

                                                             Kartik Purnima 2021 (Photo : BCCL) 

शंकरपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा देव दिवाळीला,

उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,

वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,

देव दिवाळी आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!

kartik purnima Marathi wishes 3

                                                             Kartik Purnima 2021 (Photo : BCCL) 

तिमिरातून तेजाकडे नेणारा हा सण

दाखवतो प्रकाशाची वाट, उगवते कर्तृत्वाची पहाट

नवी उमेद काजळी पुसण्याची, नात्यांचे रेशीम बंध घट्ट करण्याची

प्रकाशाचा हा उत्सव, आपले आयुष्य उजळून टाको

त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

काही पौराणिक कथांनुसार, श्रीविष्णूंनी यात दिवशी प्रथम अवतार धारण केला होता, असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. अशा प्रकारे हा पवित्र दिवस गंगा स्नान, दीपदान, होम, यज्ञ आणि उपासना करून साजरा करण्याबाबत शास्त्रात नमूद केले आहे. वाईटाचा नाश करत ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो. देशाच्या विविध भागात दीपोत्सव साजरा करत ही पौर्णिमा साजरी केली जाते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी