Tulsi Vivah 2020: या ८ मंगलाष्टकांनी करा तुळशीचे लग्न, सर्व संकटे होतील दूर

आध्यात्म
Updated Nov 21, 2020 | 16:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tulshi Vivah 2020: एकादशीच्या दिवशी तुळशीचे लग्न असते आणि यादिवशी या मंगलाष्टकांनी भगवान शाळीग्राम आणि देवी तुळशीचा विवाह करावा. असे केल्याने मनुष्याच्या आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात.

Tulshi Vivah
Tulshi Vivah 2020: या ८ मंगलाष्टकांनी करा तुळशी-शाळिग्रामाचे लग्न, सर्व संकटे होतील दूर 

थोडं पण कामाचं

  • यादिवशी देवी तुळशीला अर्पण करावे सोळा शृंगाराचे आणि सौभाग्याचे साहित्य
  • यादिवशी भगवान शाळीग्रामाचे केले जाते देवी तुळशीशी लग्न
  • एकादशीच्या दिवशी गोधुली मुहूर्तावर केले जावे तुळशीचे लग्न

Tulshi Vivah 2020: यावर्षी तुळशीचे लग्न (Tulshi Vivah) २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तुळशीचे लग्न देवप्रबोधनी एकादशीच्या (Devaprabodhani Ekadashi) दिवशीच असते, पण यादिवशी या तिथीचे दोन दिवस असल्याने देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi) २५ नोव्हेंबर रोजी तर तुळशीचे लग्न २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यादिवशी यादिवशी देवी तुळशीला सोळा शृंगाराचे आणि सौभाग्याचे साहित्य अर्पण केल्यानंतर भगवान शाळीग्रामाशी (God Shaligram) तिचा विवाह  (marriage) लावला जातो. असे मानले जाते की, हा विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य (credit of Kanyadan) मिळते आणि भगवान विष्णूचा विशेष आशीर्वादही (blessings of Lord Vishnu) प्राप्त होतो.

जीवनातील अप्रिय गोष्टी दूर करण्यासाठी करा या मंगलाष्टकांचे पठण

जर आपल्याला आयुष्यातील अप्रिय घटनांच्या होणाऱ्या पुनरावृत्तीपासून मुक्ती मिळवायची असेल तर देव उठनी एकादशीच्या दिवशी गोधुली मुहूर्तावर शाळीग्राम आणि तुळशीचे लग्न लावताना या ८ मंगलाष्टकांचे पठण करा. यामुळे मनुष्याच्या जीवनात अन्नवृद्धी, बलवृद्धी, धनवृद्धी, सुखवृद्धी, प्रजापालन, ऋतूव्यवहार आणि मित्रत्वात वृद्धी होते आणि जीवनातील सर्व कष्ट दूर होतात.

काय आहे पूजेचा विधी?

एका वाटीत थोडे तांदूळ घेऊन ते हळदीने पिवळे करा. आधी देवी तुळस आणि भगवान शाळीग्राम यांची विधिवत पूजा करा आणि नंतर या सर्व ८ मंत्रांचे उच्चारण करा. एका एका मंत्राचे उच्चारण पूर्ण झाल्यानंतर तुळस-शाळीग्रामाची सर्व दुःखे दूर करण्यासाठी प्रार्थना करा.

ही आहेत तुळशी-शाळीग्राम विवाहादरम्यान पठण करावयाची ८ मंगलाष्टके

1- ॐ श्री मत्पंकजविष्टरो हरिहरौ, वायुमर्हेन्द्रोऽनलः। चन्द्रो भास्कर वित्तपाल वरुण, प्रताधिपादिग्रहाः। प्रद्यम्नो नलकूबरौ सुरगजः, चिन्तामणिः कौस्तुभः, स्वामी शक्तिधरश्च लांगलधरः, कुवर्न्तु वो मंगलम्॥

2- गंगा गोमतिगोपतिगर्णपतिः, गोविन्दगोवधर्नौ, गीता गोमयगोरजौ गिरिसुता, गंगाधरो गौतमः। गायत्री गरुडो गदाधरगया, गम्भीरगोदावरी, गन्धवर्ग्रहगोपगोकुलधराः, कुवर्न्तु वो मंगलम्॥

3- नेत्राणां त्रितयं महत्पशुपतेः अग्नेस्तु पादत्रयं, तत्तद्विष्णुपदत्रयं त्रिभुवने, ख्यातं च रामत्रयम्। गंगावाहपथत्रयं सुविमलं, वेदत्रयं ब्राह्मणम्, संध्यानां त्रितयं द्विजैरभिमतं, कुवर्न्तु वो मंगलम्॥

4- बाल्मीकिः सनकः सनन्दनमुनिः, व्यासोवसिष्ठो भृगुः, जाबालिजर्मदग्निरत्रिजनकौ, गर्गोऽ गिरा गौतमः। मान्धाता भरतो नृपश्च सगरो, धन्यो दिलीपो नलः, पुण्यो धमर्सुतो ययातिनहुषौ, कुवर्न्तु वो मंगलम्॥

5- गौरी श्रीकुलदेवता च सुभगा, कद्रूसुपणार्शिवाः, सावित्री च सरस्वती च सुरभिः, सत्यव्रतारुन्धती। स्वाहा जाम्बवती च रुक्मभगिनी, दुःस्वप्नविध्वंसिनी, वेला चाम्बुनिधेः समीनमकरा, कुवर्न्तु वो मंगलम्॥

6- गंगा सिन्धु सरस्वती च यमुना, गोदावरी नमर्दा, कावेरी सरयू महेन्द्रतनया, चमर्ण्वती वेदिका। शिप्रा वेत्रवती महासुरनदी, ख्याता च या गण्डकी, पूर्णाः पुण्यजलैः समुद्रसहिताः, कुवर्न्तु वो मंगलम्॥

7- लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा, धन्वन्तरिश्चन्द्रमा, गावः कामदुघाः सुरेश्वरगजो, रम्भादिदेवांगनाः। अश्वः सप्तमुखः सुधा हरिधनुः, शंखो विषं चाम्बुधे, रतनानीति चतुदर्श प्रतिदिनं, कुवर्न्तु वो मंगलम्॥

8- ब्रह्मा वेदपतिः शिवः पशुपतिः, सूयोर् ग्रहाणां पतिः, शुक्रो देवपतिनर्लो नरपतिः, स्कन्दश्च सेनापतिः। विष्णुयर्ज्ञपतियर्मः पितृपतिः, तारापतिश्चन्द्रमा, इत्येते पतयस्सुपणर्सहिताः, कुवर्न्तु वो मंगलम्॥

कष्ट आणि संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुळशी विवाहानंतर तिथेच बसून या मंगलाष्टकांचे पठण करा.

(Disclaimer: हे वृत्त केवळ तुमच्या माहितीसाठी आहे. असे केल्याने संकटापासून मुक्ती होते अशी अनेकांची मान्यता आहे आणि आम्ही त्याचे केवळ वृत्तांकन करत आहोत. याचे आम्ही समर्थन करत नाहीत.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी