Janmashtami 2022: भगवान कृष्णाला प्रिय आहेत या ५ गोष्टी, जन्माष्टमीच्या पुजेत सामील करा या वस्तू

आध्यात्म
Updated Aug 16, 2022 | 15:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

जन्माष्टमीच्या दिवशी पुजा करताना भगवान श्रीकृष्णाला त्याच्या प्रिय वस्तू अर्पण केल्याने विशेष कृपा मिळते. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या ५ गोष्टी ज्यांचा जन्माष्टमीच्या पुजेत जरूर समावेश केला पाहिजे. 

krishna
कृष्णाला प्रिय या ५ गोष्टी, जन्माष्टमीच्या पुजेत करा सामील 
थोडं पण कामाचं
  • जन्माष्टमीच्या दिवशी पुजेमध्ये धण्याच्या पंजिरीचा जरूर समावेश करा कारण भगवान श्रीकृष्णाला धण्याची पंजिरी विशेष प्रिय आहे.
  • श्रीकृष्णाला मोरपीस अतिशय़ प्रिय आहे आणि त्याच्या मुकुटात मोरपीस लावलेले असते.
  • पौराणिक कथांनुसार भगवान श्रीकृष्ण लहानपणापासून गायीची सेवा करत होते.

मुंबई:  श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीला भगवान कृष्णाचा(Lord krishna जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी अष्टमी तिथी १८ ऑगस्टला रात्री ९.२० वाजून सुरू होत १९ ऑगस्ट २०२२ला १०.५९ पर्यंत राहणार आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता. यामुळेच जन्माष्टमी १८ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी पुजा करताना भगवान श्रीकृष्णाला त्याच्या प्रिय वस्तू अर्पण केल्याने विशेष कृपा मिळते. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या ५ गोष्टी ज्यांचा जन्माष्टमीच्या पुजेत जरूर समावेश केला पाहिजे. Use this 5 things in shri krishna pooja

अधिक वाचा - गजकर्णामुळे चारचौघात बसणं-उठणं अवघड झालंय का? मग हे उपाय करा

लोणी आणि खडीसाखर हे श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहेत आणि अनेक पौराणिक कथांमध्ये सांगितले आहे की कृष्णाला लहानपणी लोणी आणि खडीसाखर हे चोरून खायला आवडत असे. त्यामुळे जन्माष्टमीच्या पुजेमद्ये भगवान कृष्णाला लोणी आणि खडीसाखरेचा प्रसाद जरूर चढवा. 

श्रीकृष्णाला मोरपीस अतिशय़ प्रिय आहे आणि त्याच्या मुकुटात मोरपीस लावलेले असते. असे मानले जाते की श्रीकृष्णाला मोरपीस अर्पण केल्यानंतर त्याची विशेष कृपादृष्टी होते. या पीसामुळे नकारात्मकताही दूर होते आणि हे घरात ठेवल्याने अतिशय फायदे होतात. 

जन्माष्टमीच्या दिवशी पुजेमध्ये धण्याच्या पंजिरीचा जरूर समावेश करा कारण भगवान श्रीकृष्णाला धण्याची पंजिरी विशेष प्रिय आहे. असे मानले जाते की धण्याचा संबध धनाशी असतो त्यामुळे कृष्णाला ही पंजिरी अर्पण केल्यास धनहानी होत नाही. 

श्रीकृष्णाच्या हातात नेहमी बासुरी असते. ही त्यांच्या अनेक लोकप्रिय वस्तुंपैकी एक आहे. मान्यतेनुसार जन्माष्टमीच्या पुजेमध्ये बासरी ठेवल्याने लड्डू गोपाली विशेष कृपा राहते. 

अधिक वाचा - जवानांनी भरलेली बस कोसळली नदीत, 6 जवान शहीद

पौराणिक कथांनुसार भगवान श्रीकृष्ण लहानपणापासून गायीची सेवा करत होते. त्यांना गोमाता अतिशय प्रिय आहे. यामुळे जन्माष्टमीचया पुजेत तुम्ही गोमातेची मूर्ती ठेवू शकता अथवा एखाद्या गायीला प्रसाद अर्पण करा. 

जन्माष्टमीच्या दिवशीचे शुभ संयोग

या वेळी १८ ऑगस्ट, गुरुवारी वृद्धी योग तयार होत आहे. या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी १२.०५ वाजल्यापासून सुरू होईल आणि  १२.५६ पर्यंत राहील. त्याच वेळी, वृद्धी योगाचा निर्माण १७ ऑगस्टच्या रात्री ८.५६  वाजता सुरू होते तसेच १८ ऑगस्टला  रात्री ८.४१ वाजता समाप्त होते.  ज्योतिष शास्त्रानुसार जन्माष्टमीच्या दिवशी ध्रुव योग १८ ऑगस्टला रात्री ८:४१ ते १९ ऑगस्टला रात्री ८:५९ पर्यंत राहील. या दिवशी १८ आणि १९ ऑगस्ट असे दोन दिवस जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी