मुंबई: शरीरात जमा असलेली चरबी(fat) अनेकांसाठी शरमेचे कारण असते. तसेच हे बेली फॅट(belly fat) आपला लूक खराब करते. हे कमी करण्यासाठी लोक विविध प्रकारचे डाएट(diet) तसेच एक्सरसाईज(exercise) फॉलो करतात. आपणही फिट आणि आकर्षक दिसावे असे कोणाला वाटत नाही. मात्र शरीराचे वाढलेले वजन अथवा लठ्ठपणामुळे असे होत नाही. इतकंच नव्हे तर शरीरात जमा असलेली चरबी अनेकदा गंभीर आजारांना निमंत्रण देते. अशातच आम्ही तुम्हाला असे नियम सांगणार आहोत जे रात्रीच्या जेवणादरम्यान तुम्ही फॉलो केले पाहिजेत. या पद्धतीने तुम्ही बेली फॅटसह संपूर्ण शरीराचा लठ्ठपणा घालवू शकता. use this dinner rules for reduce belly fat
अधिक वाचा - बुलेट ट्रेनला महाराष्ट्र शासनाचा ग्रीन सिग्नल
संध्याकाळच्या वेळेस होलसम मील घ्या. यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटेल. यामुळे तुम्ही रात्रीचे कमी जेवाल. रेड राईस, हिरवे मूग, आवळा, दूध, जव, बाजरी, डाळिंब, मध, किशमिश, सैंधव मीठाचे सेवन तुम्ही करू शकता. यामुळे शरीरास कोणतेही नुकसान पोहोचत नाही. हे पदार्थ विशेष पद्धतीने धान्य आणि प्रोटीन प्रकृतीने हलके आणि पचण्यास सोपे असतात.
रात्रीच्या जेवणात नाचणी डोसा, नाचणी पुलाव, नाचणी खिचडी सारखे पर्याय पचण्यास सोपे असतात तसेच त्यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. सोबतच हे पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. यांच्या दररोजच्या सेवनाने तुम्ही सोप्या पद्धतीने पोटाची चरबी कमी करू शकता.
अधिक वाचा - BF साठी तरुणींमध्ये दे दना दन !
पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही सूर्यास्ताआधी डिनर करा. असे केल्याने तुम्ही सोप्या पद्धतीने वजन घटवू शकता.