आज आहे उत्पन्ना एकादशी , जाणून घ्या 30 नोव्हेंबर 2021 चा पंचांग, ​​शुभ मुहूर्त, योग

आध्यात्म
भरत जाधव
Updated Nov 30, 2021 | 12:24 IST

Utpanna Ekadashi:आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी आहे. या एकादशीला उत्पन्ना एकादशी म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णूसोबत त्यांच्या योग शक्तीची पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की, एकादशीचा उपवास विधीपूर्वक केल्याने आपला आत्मविश्वास वाढत असतो.

Utpanna Ekadashi
उत्पन्ना एकादशी: जाणून घ्या पंचांग, ​​ ​​शुभ मुहूर्त, योग  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • आज मंगळवार असल्याने हनुमानजींचे व्रत आणि पूजा करण्याचा नियम आहे.
  • एकादशीचा उपवास विधीपूर्वक केल्याने आपला आत्मविश्वास वाढत असतो.

Utpanna Ekadashi: आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी आहे. या एकादशीला उत्पन्ना एकादशी म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णूसोबत त्यांच्या योग शक्तीची पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की, एकादशीचा उपवास विधीपूर्वक केल्याने आपला आत्मविश्वास वाढत असतो. संसारात येणाऱ्या सर्व दु;खातून बाहेर पडत असतो आणि त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात.. यासोबतच मंगळवार असल्याने हनुमानजींचे व्रत आणि पूजा करण्याचा नियम आहे.  शुभ मुहूर्त, राहुकाल, दिशाशूल याशिवाय आजच्या पंचांगात सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त आदींची माहिती आम्ही या लेखात देत आहोत.. 

आजचे पंचांग

  • आजची ग्रह स्थिती: 30 नवंबर, 2021 मंगलवार मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष एकादशी तिथी.
  • आज का राहुकाल: दुपारी 03:00 ते 04:30 वाजेपर्यंत.
  • आजचे दिशाशूल: उत्तर.
  • आजचे पर्व आणि सण: उत्पन्ना एकादशी.

विक्रम संवत 2078 शके 1943 दक्षिणायन, दक्षिणगोल, हेमंत ऋतु मार्गशीर्ष मास कृष्ण पक्षाची एकादशी 26 घंटे 15 मिनिटापर्तयत, त्यानंतर द्वादशी हस्त नक्षत्र 20 तास 34 मिनिटे, त्यानंतर चित्रा नक्षत्र आयुष्मान योग 24 तास 02 मिनिटे, त्यानंतर सौभाग्य योग कन्या राशीत चंद्र.

सूर्योदय आणि सूर्यास्त

या दिवशी सूर्योदय सकाळी 06:56 वाजता झाला आहे, तर सूर्यास्त संध्याकाळी 5:24 वाजता होईल.

चंद्रोदय आणि चंद्रास्त

चंद्रोदय आज रात्री 03:17 वाजता होणार आहे. चंद्र मावळण्याची वेळ दुसऱ्या दिवशी दुपारी 02:37 वाजता आहे.
आजची शुभ वेळ
आयुष्मान योग - 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 02.50 वाजेपासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, 01 डिसेंबर रोजी रात्री 12.03 पर्यंत सुरू राहील. यानंतर शुभ योग येतील.

  • ब्रह्म मुहूर्त:  सकाळी 05:07 ते 06:02 पर्यंत.
  • अभिजित मुहूर्त: आज दिवसभरात सकाळी 11.49 ते दुपारी 12.31 वाजेपर्यंत
  • विजय मुहूर्त: दुपारी 01:54 ते दुपारी 12:36 पर्यंत.
  • अमृत ​​काळ: संध्याकाळी 02:51 ते 04:23 पर्यंत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी