Vaishakh Purnima 2022 Date: कधी आहे वैशाख पौर्णिमा? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि पूजा पद्धती

आध्यात्म
Updated May 06, 2022 | 16:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vaishakh Purnima 2022 Date । यंदा वैशाख महिन्याची पौर्णिमा १६ मे रोजी आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णूचा नववा अवतार भगवान बुद्ध यांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला बुद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती असे म्हणतात. बुद्ध पौर्णिमेची तिथी अत्यंत शुभ मानली जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार वैशाख महिना भगवान विष्णूला सर्वात प्रिय आहे.

Vaishakh Purnima 2022 Date Learn its importance and worship methods
कधी आहे वैशाख पौर्णिमा? वाचा त्याचे महत्त्व आणि पूजा पद्धती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यंदा वैशाख महिन्याची पौर्णिमा १६ मे रोजी आहे.
  • या दिवशी भगवान श्री विष्णूचा नववा अवतार भगवान बुद्ध यांचा जन्म झाला होता.
  • ब्रह्माजींनी वैशाख महिन्याचे वर्णन हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यामध्ये केले आहे.

Vaishakh Purnima 2022 Date । मुंबई : यंदा वैशाख महिन्याची पौर्णिमा १६ मे रोजी आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णूचा नववा अवतार भगवान बुद्ध यांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला बुद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती असे म्हणतात. बुद्ध पौर्णिमेची तिथी अत्यंत शुभ मानली जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार वैशाख महिना भगवान विष्णूला सर्वात प्रिय आहे. ब्रह्माजींनी वैशाख महिन्याचे वर्णन हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यामध्ये केले आहे. भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मी, भोलेनाथ आणि श्रीकृष्ण यांनाही या शुभ आणि पवित्र दिवशी व्रत आणि प्रार्थना करून प्रसन्न करता येते. यांचे व्रत नित्यनियमाने केल्यास इच्छुक परिणाम मिळतात असा समज आहे. चला तर म जाणून घेऊया वैशाख पौर्णिमेचे महत्त्व आणि त्याच्या पूजा पद्धती. (Vaishakh Purnima 2022 Date Learn its importance and worship methods). 

अधिक वाचा : एका फ्रेममध्ये ठाकरे परिवाराच्या पाच पिढ्या

हिंदू धर्माच्या पंचांगानुसार वैशाख महिन्यातील पौर्णिमेचे व्रत १६ मे रोजी केले जाणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे वैशाख महिन्याची पौर्णिमा १२ मे २०२२ रोजी दुपारी १२:४५ वाजता सुरू होईल. तर पौर्णिमेची तिथी १६ मे च्या रात्री ९:४५ वाजता समाप्त होईल.

अधिक वाचा : कडक उन्हामुळे तुमच्या पायांवर पडलेत काळे डाग?, वाचा सविस्तर

वैशाख पौर्णिमेचे महत्त्व

हिंदू धर्मांच्या मान्यतेनुसार वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. हा दिवस सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. असेही मानले जाते की या दिवशी चंद्राची पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील चंद्र दोष दूर होत असतो. याशिवाय वैशाख पौर्णिमेचे व्रत केल्याने सर्व पाप आणि वाईट कर्मांपासून मुक्ती मिळते, असाही समज आहे. यासोबतच मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो. एवढेच नाही तर यमराज देवतेला प्रसन्न करण्यासाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा आणि नियमानुसार पूजा करावी, अशीही हिंदू धर्मात श्रद्धा आहे.

जाणून घ्या कशी करावी पूजा 

पंडित गोविंद पांडेजी यांच्या म्हणण्यानुसार, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी उपवास केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी उपवास करण्याचे अनेक विधी आहेत. जर तुम्ही वैशाख पौर्णिमेला उपवास करत असाल तर या दिवशी सकाळी उठून स्नान करण्यापूर्वी त्या पाण्यात कोणत्याही गंगेचे पाणी टाकून स्नान करावे. स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. (हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन सूर्यासमोर तोंड करून सूर्यास जल समर्पित केले जाते. त्यालाच 'अर्घ्य' म्हटले जाते.) अर्घ्य देताना 'ओम सूर्याय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम आदित्य नमः' या मंत्राचा तीन वेळा जप करावा. 

सत्यनारायणाची कथा केल्याने मिळतो लाभ

यानंतर घरातील मंदिरात दिवा लावून विष्णूजींची पूजा करा आणि त्यांची आरती आणि मंत्राचा जप करा. या दिवशी सत्यनारायणाची कथा केल्याने अनेक फायदे होतात. यानंतर संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. लक्षणीय बाब म्हणजे देवाला नैवेद्य दाखवल्यानंतरच इतरांनी भोजन करावे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी