Valmiki Jayanti 2021 Marathi Wishes: महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त मराठी शुभेच्छा 

वैदिक काळातील महान ऋषी महर्षि वाल्मिकी (Valmiki) यांचा जन्म, शरद ऋतूमध्ये झाला म्हणून वाल्मिकी जयंती (Valmiki Jayanti) दरवर्षी अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी वाल्मिकी जयंती 20 ऑक्टोबरला साजरी केली जाईल.

Valmiki Jayanti 2021 Marathi Wishes: महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त मराठी शुभेच्छा 
महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त मराठी शुभेच्छा  
थोडं पण कामाचं
  • वैदिक काळातील महान ऋषी महर्षि वाल्मिकी (Valmiki) यांचा जन्म, शरद ऋतूमध्ये झाला
  • वाल्मिकी जयंती (Valmiki Jayanti) दरवर्षी अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेला साजरी केली जाते.
  • वाल्मिकी जयंती 20 ऑक्टोबरला साजरी केली जाईल.

वैदिक काळातील महान ऋषी महर्षि वाल्मिकी (Valmiki) यांचा जन्म, शरद ऋतूमध्ये झाला म्हणून वाल्मिकी जयंती (Valmiki Jayanti) दरवर्षी अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी वाल्मिकी जयंती 20 ऑक्टोबरला साजरी केली जाईल. मान्यतेनुसार शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मी देखील प्रकट झाली होती. बर्‍याच भाषांचे विद्वान म्हणून ओळखल्या जाणार्‍या महर्षि वाल्मिकी यांनी संस्कृत भाषेत रामायण रचले. महर्षि वाल्मिकींच्या जन्माविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, मात्र पौराणिक कथेनुसार महर्षि वाल्मिकी यांचा जन्म महर्षि कश्यप आणि आदितीचा नववा मुलगा, वरुण आणि त्यांची पत्नी चधैशी यांच्या पोटी झाला होता असे सांगितले जाते. तर अशा रामायणाचे रचनाकर्ते, थोर महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा 


वाल्मिकी एक दरोडेखोर होते आणि  त्यांचे पालनपोषण भिल्ल जातीमध्ये झाले होते. वाल्मिकींना रत्नाकर म्हणूनही ओळखले जात असे. रत्नाकरला जेव्हा त्यांच्या पापांची जाणीव झाली तेव्हा त्याने दरोडेखोराचा मार्ग सोडून नवा मार्ग स्वीकारण्याचे ठरविले. त्यावेळी नारदांनी त्यांना मार्ग दाखवला आणि राम नावाचा जप करण्यास सांगितले.

Valmiki Jayanti marathi wishes 3

                              Valmiki Jayanti marathi Wishes 2021 (Photo : BCCL ) 

Valmiki Jayanti marathi wishes

                              Valmiki Jayanti marathi Wishes 2021 (Photo : BCCL ) 

Valmiki Jayanti marathi wishes 1

                            Valmiki Jayanti marathi Wishes 2021 (Photo : BCCL ) 

Valmiki Jayanti marathi wishes 2

                            Valmiki Jayanti marathi Wishes 2021 (Photo : BCCL ) 

Valmiki Jayanti marathi wishes 4

                            Valmiki Jayanti marathi Wishes 2021 (Photo : BCCL ) 

त्यांचा अनेक वर्ष जप सुरू राहिला, या काळात वाल्मिकींचे शरीर दुबळे झाले. त्यावर मुंग्याही चढल्या. त्यांच्या अवतीभवती मुंग्यांनी वारूळ बांधले होते. तरी त्यांनी जप सोडला नाही.  तरी हा जप अखंड चालू होता हे पाहून ब्रह्मदेव प्रसिद्ध झाले आणि ब्रह्मदेवांनी त्यांना ज्ञान आणि रामायण लिहिण्याची प्रेरणा दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी