Vaman Dwadashi 2022 : भगवान विष्णूच्या (Lord Vishnu) विविध अवतारांपैकी हा एक अवतार म्हणजे वामन अवतार असून हा पाचवा अवतार मानला जातो. त्रेतायुगात दैत्यांचा राजा बळीचा अहंकार दूर करण्यासाठी भगवान विष्णू (Bhagvan Vishnu) यांनी वामन अवतार घेतला होता. वामन द्वादशी जयंती (Vaman Dwadashi 2022) ही विष्णू जयंती (Vishnu Jayanti) म्हणूनही ओळखली जाते. या दिवसाला विशेष अध्यात्मिक महत्त्व आहे. आषाढ शुक्ल पक्षात येणाऱ्या या द्वादशीला वामन द्वादशी म्हटले जाते. या दिवशी वामन द्वादशी व्रत करत विधिवत पूजन केले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने मनुष्याच्या आतील अहंकाराची भावना नाहीशी होते.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला 10 जुलै रोजी 2:14 पासून प्रारंभ झाला आहे. तर द्वादशी तिथी सोमवार 11 जुलै रोजी सायंकाळी 5:02 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार वामन द्वादशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सोमवार 11 जुलै रोजी सकाळी 7:22 ते सायंकाळी 5:02 पर्यंत आहे. या दिवशी सकाळी स्नान करून वामन मूर्तीची स्थापना करत पूजा केली जाते. पूजेत फळे आणि काजू ठेवले जातात. या दिवशी कलशात पाणी भरून अर्घ्य देण्याचे विशेष महत्त्व आहे.
भगवान वामनाची उपासना केल्याने व्यक्तीच्या मनातील अहंकार दूर होतो. तसेच भगवान वामनांचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासह सर्व पापांपासून मुक्ती मिळते. भगवान वामनाच्या आशीर्वादाने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. व्यवसायात प्रगती होते.
वामन द्वादशीला पूजेनंतर ब्राह्मणाला एक वाटी तांदूळ, एक वाटी साखर, एक वाटी दही दान करा. यावेळी ब्राह्मणांना हार, कमंडले, काठी, आसन, गीता, छत्र, खताळ, फळे आणि दक्षिणा दिल्याने भगवान वामनाचा आशीर्वाद प्राप्त होतो.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)