varuthini ekadashi 2023, significance, history, pujavidhi, vrat, katha, vratkatha : महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार रविवार 16 एप्रिल 2023 रोजी चैत्र मासातील कृष्णपक्षातील वरुथिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. हा चैत्र महिन्यातला अकरावा दिवस आहे.
धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म ।
महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार चैत्र महिन्यातली एकादशी ही तिथी शनिवार 15 एप्रिल 2023 रोजी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी सुरू होत आहे. या तिथीची समाप्ती रविवार 16 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 14 मिनिटांनी होईल.
काही वेळा इंग्रजी कॅलेंडरच्या दोन दिवसांमध्ये तिथी विभागली असते. जेव्हा अशी परिस्थिती असते त्यावेळी सूर्योदयाचा काळ कधी आहे हे बघितली जाते. यंदा एकादशीच्या काळात सूर्योदय रविवार 16 एप्रिल 2023 रोजी आहे. याच कारणामुळे यंदाची वरुथिनी एकादशी रविवार 16 एप्रिल 2023 रोजी साजरी होणार आहे.
वरुथिनी एकादशी ही तिथी शनिवार 15 एप्रिल 2023 रोजी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी सुरू होत आहे. या तिथीची समाप्ती रविवार 16 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 14 मिनिटांनी होईल. हा पूर्ण काळ शुभ आहे. पण यातही रविवार 16 एप्रिल 2023 रोजी सूर्योदयापासूनचा काळ जास्त चांगला आहे.
असे सांगतात की राक्षस कुळात जन्मलेल्या राजा मांधाता याने वरुथिनी एकादशीचे व्रत केले. यामुळे राजाला पुण्य लाभले आणि मृत्यूनंतर राजाला मोक्ष मिळाला. राजाची जीवनमृत्यूच्या फेऱ्यातून सुटका झाली.
वरुथिनी एकादशी ही भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी विष्णू देव आणि त्यांची पत्नी माता लक्ष्मी यांची मनोभावे पूजा करतात. या पूजेमुळे घरात सुखसमृद्धी नांदते. अडचणी आणि संकटे दूर होतात असे सांगतात.
एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने सुर्योदयापूर्वी उठावे आणि आंघोळ करून घ्यावी. त्यानंतर भगवान विष्णूची पुजा करावी. भगवान विष्णूला धूप, चंदन आणि फळ अर्पण करून दिवा लावावा. देवाची व्रत कथा ऐकावी आणि आरती करावी. गरजूंना दान करावे. अन्नदान करावे. एकादशीच्या काळात देवाची आराधना करावी. व्रत काळात उपवास करावा. चांगले कर्म करावे. वाईट, चुकीचे कर्म करू नये. हे व्रत दुसर्या दिवशी द्वादशीच्या तिथीला सोडावे. उपवास सोडण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा करावी.
एकादशी हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला (पंधरवड्यातला) अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातल्या दोन पंधरवड्यांत (पक्षांत) प्रत्येकी एक अशा प्रकारे दोन वेळा एकादशी येते. मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात महिन्यातला कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाच्या आधी येत असल्याने कृष्ण पक्षात येणारी विशिष्ट नावाची एकादशी नंतरचे नाव असलेल्या महिन्यात येते. उदा : ज्या दिवशी महाराष्ट्रात आषाढ महिन्यातील कामिका एकादशी असते, त्यादिवशी मध्य प्रदेशात श्रावण महिन्यातली कामिका एकादशी असते. हा प्रकार शुक्ल एकादशींच्या बाबतीत होत नाही.
प्रत्येक मासात (महिन्यात) 2 प्रमाणे वर्षाला 24 एकादशी असतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी यांचा समावेश होतो. कृष्ण पक्षात पापमोचनी, वरुधिनी (वरुथिनी), अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्तिला व विजया या एकादशींचा समावेश होतो. पौराणिक कथेनुसार, एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास केला जातो. या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात.
14 देशांचा जावई, 105 वेळा केले लग्न