Vasant Panchami Day Date Time vivah shubh muhurat: वसंत पंचमीपासून वसंत ऋतूची सुरुवात होते. वसंत पंचमीचा सण हा भारतात खासकरुन उत्तर भारतात मोठ्या प्रणामात साजरा केला जातो. या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा करतात. वसंत पंचमी हा दिवस खूप शुभ मानला जातो. जाणून घ्या यंदाच्या वर्षी वसंत पंचमी कधी आहे आणि या दिवशी लग्नासाठीचा मुहूर्त खास का आहे. (Vasant Panchami 2023 date and time shubh muhurat for marriage to these people read details in marathi)
2023 या वर्षात 26 जानेवारी रोजी वसंत पंचमी आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते. वसंत पंचमीला श्री पंचमी असे सुद्धा म्हणतात. या दिवशी सरस्वती देवीची पूजा करण्यात येते. वसंत पंचमी ही माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरी करण्यात येते. पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्ष पंचमी तिथीची सुरुवात 25 जानेवारी रोजी दुपारी 12.34 वाजता होत आहे. तर 26 जानेवारी रोजी सकाळी 10.28 वाजता समाप्त होत आहे. तिथीनुसार, वसंत पंचमी 26 जानेवारी रोजी साजरी करणं शुभ असेल.
हे पण वाचा : गोरे होण्यासाठी काय खावे? सौंदर्य वाढविण्यासाठी कामी येतील ही फळे
ज्योतिष शास्त्रानुसार, वसंत पंचमीच्या दिवशी संपूर्ण दिवस दोषरहित श्रेष्ठ योग असतो. याच्याव्यतिरिक्त या दिवशी रवी योग याचाही शुभ संयोग बनत आहे. शास्त्रांनुसार, वसंत पंचमीच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वती यांचं तिलकोत्सव झालं होतं. तेव्हापासून लग्नासाठी वसंत पंचमी हा दिवस शुभ मानला जातो.
हे पण वाचा : महिलांनी या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत, अन्यथा...
वसंत पंचमीच्या दिवशी शुभ मुहूर्त असतो. ज्या व्यक्तींना लगेचच लग्न करायचं आहे अशा व्यक्तींसाठी वसंत पंचमीचा दिवस सर्वश्रेष्ठ असतो. तसेच लग्न ठरलेलं असेल मात्र, शुभ मुहूर्त मिळत नसेल तर वसंत पंचमीच्या दिवशी विवाह करु शकतात. लग्नासाठी नवरदेव आणि वधू तयार असतील मात्र, गुण जुळत नसतील असे व्यक्ती वसंत पंचमीच्या दिवशी लग्न करु शकतात.
हे पण वाचा : झोपण्यासाठी अशी खरेदी करा मऊ गादी, आयुष्याची होईल चांदी
वसंत पंचमीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करुन देवी सरस्वतीची पूजा केली जाते. तसेच विवाहासाठी सुद्धा हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी गृह प्रवेश, नव्या नोकरीची सुरुवात, एखाद्या नव्या कामाची सुरुवात, भूमी पूजन, मुंडन यासारखी कार्य केली जातात.