Vasant Panchami Puja shubh muhurat, what to do on this day: हिंदू धर्मात वसंत पंचमीला फार महत्त्व आहे. वसंत पंचमीला (Vasant Panchami) बसंत पंचमी (Basant Panchami) असेही म्हणतात. या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा करतात. संपूर्ण भारतात वसंत पंचमी साजरी करण्यात येते. उत्तर भारतात वसंत पंचमी मोठ्या प्रमाणात साजरी होते. हिंदू पंचागानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्ष पंचमीला वसंत पंचमी साजरी होते. या दिवशी सरस्वती पूजा करण्यात येते. (Vasant Panchami 2023 saraswati puja time shubh muhurat read details in marathi)
पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्ष पंचमी तिथीची सुरुवात 25 जानेवारी रोजी दुपारी 12.34 वाजता होत आहे. तर 26 जानेवारी रोजी सकाळी 10.28 वाजता समाप्त होत आहे. तिथीनुसार, वसंत पंचमी 26 जानेवारी रोजी साजरी करणं शुभ असेल. या दिवशी सरस्वती पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 7 वाजून 12 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल.
हे पण वाचा : बडीशेप खा आणि चमत्कार पहा
वसंत पंचमी म्हणजेच सरस्वती पूजेच्या दिवशी शिव योग आहे. हा दिवस खूपच शुभ मानला जातो. या योगची सुरुवात 26 जानेवारी रोजी सकाळी 3 वाजून 10 मिनिटांपासून होणार आहे. तर हा योग दुपारी 3 वाजून 29 मिनिटांपर्यंत असणार आहे.
हे पण वाचा : नारळ पाणी प्या अन् वजन कमी करा
हे पण वाचा : डोक्यापासून ते पायापर्यंत व्हिटॅमिन ई चे असंख्य फायदे