Vastu Tips : नवीन वर्षापूर्वी घरी आणा या सात गोष्टींपैक एक गोष्ट, वर्षभर होईल प्रगती

आध्यात्म
भरत जाधव
Updated Dec 02, 2021 | 17:01 IST

Vastu Tips For Goddess Lakshmi Blessings:वर्ष 2021 हा अखेरचा महिना चालू आहे. या महिन्यात कोरोना (corona) विषाणूचं संक्ट, वाढती महागाई (Inflation)मुळे नागरिकांना आर्थिक (Financial) संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत येणारे वर्ष आपल्यासाठी सुख समृद्धीचं यावं, यासाठी काही उपाय योजना करणं आवश्यक आहे. 

Vastu Tips For Goddess Lakshmi Blessings:
नवीन वर्षापूर्वी घरी आणा या सात गोष्टींपैक एक गोष्ट  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • नव्या वर्षापूर्वी तुळशी किंवा मनी प्लांटचे झाड आणून आपल्या घराच्या अंगणात किंवा गॅलरीत लावावे.
  • मोरपंख घरात सुख-समुद्धी आणत असते.

Vastu Tips For Goddess Lakshmi Blessings:  नवी दिल्ली :  वर्ष 2021 हा अखेरचा महिना चालू आहे. या महिन्यात कोरोना (corona) विषाणूचं संक्ट, वाढती महागाई (Inflation)मुळे नागरिकांना आर्थिक (Financial) संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत येणारे वर्ष आपल्यासाठी सुख समृद्धीचं यावं, यासाठी काही उपाय योजना करणं आवश्यक आहे. 

मोरपंख

भगवान श्रीकृष्ण (Lord Krishna) यांचे प्रिय असलेले मोरपंख घरात सुख-समुद्धी आणत असते. अशात जर तुम्ही 1 ते 3 मोरपंख आणून भगवान श्रीकृष्णाच्या कपाळी लावावे. किंवा तुम्ही घराच्या भिंतीवरही त्याला लावू शकतात.  

गोमती चक्र

अशी मान्यता आहे की, घरात गोमती चक्र ठेवल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होत असते. वास्तूशास्त्रानुसार, 11 गोमती चक्राला पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवल्याने वर्षभर आर्थिक लाभ होत असतो. 

तुळशी किंवा मनी प्लांट 

नव्या वर्षापूर्वी तुळशी किंवा मनी प्लांटचे झाड आणून आपल्या घराच्या अंगणात किंवा गॅलरीत लावावे. मनी प्लांटला आपण घरातही लावू शकतो. या झाडांमुळे घरात सुख-समुद्धी आणि संपन्नता येते.

कमळ फुलांच्या कळ्या

लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळावा यासाठी कमळ फुलांच्या कळ्यांची माळा तयार करुन लक्ष्मी मातेला अर्पण कराव्यात. लक्ष्मी मातेची कृपा झाल्याने तुमच्या घऱी पैशांची तंगी राहणार नाही. 

हसणारा बुद्ध

नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर दोन्ही हातात कमंडल घेतलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती घरी आणा. मान्यता आहे की, उत्तर-पूर्वच्या दिशेत त्या मुर्तीला ठेवल्याने घऱाची प्रगती होत असते. 

स्वास्तिकचं चित्र 

पुराणात स्वस्तिक हे लक्ष्मी आणि गणेशाचे प्रतीक मानले गेले आहे. असे मानले जाते की ते घरात ठेवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. चित्र आणायचे नसेल तर भिंतीवर लाल कुंकूने स्वस्तिक बनवून लावू शकता. असे मानले जाते की यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू देत नाही.

शंख

वास्तुनुसार घरामध्ये दक्षिणावर्ती आणि मोत्याचा शंख ठेवणे देखील शुभ असते. नवीन वर्षाच्या आधी ते विकत घ्या आणि त्याची पूजा करा आणि नंतर कपाट किंवा तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहत असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी