वास्तुशास्त्र: घरात या दिशेला लावा आरसा, आर्थिक संकटासह इतर समस्यांतून होईल सुटका

आध्यात्म
Updated Dec 14, 2019 | 11:51 IST | टाइम्स नाऊ हिंदी

घरात जर आर्थिक चणचण भासत असेल तर आरशासंबंधित काही महत्त्वपूर्ण उपाय नक्कीच करावेत. आरसा घरात योग्य ठिकाणी असल्यास धनलाभाचा मार्ग आणखी सोपा होऊन जातो.

वास्तुशास्त्र: घरात या दिशेला लावा आरसा, आर्थिक संकटासह इतर समस्यांतून होईल सुटका
Vastu tips: correct direction of mirror in the house   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी, धनलाभ या गोष्टींचा संबंध अनेकदा घरातल्या वास्तुशी असतो.
  • आरसा घरात योग्य ठिकाणी असल्यास धनलाभाचा मार्ग आणखी सोपा होऊन जातो
  • आरसा योग्य दिशेला आणि वास्तुशास्त्रानुसार घरात लावला गेला पाहिजे.

आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी, धनलाभ या गोष्टींचा संबंध अनेकदा घरातल्या वास्तुशी असतो. घरता कोणत्या ठिकाणी काय आहे यावरदेखील तुमचे आयुष्य आणि भविष्य अवलंबून असते. घरातील वास्तु योग्य नसेल तर आपले आयुष्य कष्टाने भरलेले असू शकते.

हे कष्ट शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. प्रत्येक कष्टाचे कारम हे वेगवेगळे असू शकते. अशाचप्रकारे जर घरातील वास्तु योग्य प्रकारे असण्यासाठी काही लहान मोठे उपाय केले गेले तर हे कष्ट कमी होऊ शकतात.

घरात जर आर्थिक चणचण भासत असेल तर आरशासंबंधित काही महत्त्वपूर्ण उपाय नक्कीच करावेत. आरसा घरात योग्य ठिकाणी असल्यास धनलाभाचा मार्ग आणखी सोपा होऊन जातो. मात्र यासाठी आरसा योग्य दिशेला आणि वास्तुशास्त्रानुसार घरात लावला गेला पाहिजे. घरात आरसा नक्की कुठे लावायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

घरात अशाप्रकारे आरसा लावल्यास होईल धनलक्ष्मीचा उत्तम लाभ:

  1. तुम्ही पैसे ज्या ठिकाणी ठेवत असाल त्याच्या समोर आरसा लावा. घरात जिथे तुमची तिजोरी किंवा लॉकर असेल त्याच्या समोर आरसा लावा. असे केल्यास तुमच्याकडे असलेले धन दुप्पट होण्यास चालना मिळते.
  2. धनाच्या ठिकाणी आरसा लावा. घरात ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्याचठिकाणी एखादा लहानसा आरसा ठेवावा. जेणेकरून तुम्हाला त्या पैशाचे किंवा तुमच्या मालमत्तेचे प्रतिबिंब त्या आरशात कायम दिसेल.
  3. उत्तरेच्या दिशेला आरसा लावा. घरात जर पैशाची खुपच कमतरता किंवा हानी होत असल्याचे तुमच्या लक्षात आले तर घरात उत्तर दिशेला आरसा लावा. उत्तर दिशेला भगवान कुबेरचा निवास असतो. त्यामुळे उत्तर दिशा तुमची आर्थिक वृद्धीतसेच सकारात्मक उर्जा वाढविण्याचे काम करते.
  4. लाल रंगाच्या पाकिटात आरसा ठेवा. आपण रोजच्या व्यवहारासाठी वापरत असलेल्या पर्स किंवा पाकिटात एक लहानसा आरसा ठेवा. हे पाकिट लाल रंगाचेच असावे याची काळजी घ्या. काळ्या रंगाच्या पाकिटात आरसा ठेवू नये.
  5. कॅश बॉक्समध्ये आरसा ठेवा. पैशाची वृद्धी होण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या कॅश बॉक्समध्ये आरसा ठेवा. यामुळे तुमच्याजवळील पैसा वाढत जाईल तो कमी पडणार नाही.
  6. असा असावा ड्रेसिंग टेबलचा आरसा. ड्रेसिंग रूममध्ये जो आऱसा तुम्ही लावाल तो जमिनीपासून किमान ४ ते ५ फूट वरती असावा. जमिनीला टेकून हा आरसा लावू नये.

तर अशाप्रकारे वास्तशास्त्रानुसार आफल्या घरात आरसा लावल्याने तुमची होत असलेली पैशाची हानी वाचवून धनलक्ष्मी आगमनाचा मार्ग मोकळा करू शकता.

(टीप: आम्ही या गोष्टींचं समर्थन करत नाही. मात्र, असं करणं हे चांगलं असल्याची अनेकांची मान्यता आहे आणि आम्ही त्याचं केवळ वृत्तांकन करत आहोत.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी