घरात किंवा आजूबाजूला लावा अशोकाचं झाड, वास्तुदोष दूर होण्यापासून होतील अनेक फायदे

Vastu tips: बहुतेक लोकांच्या घरात उंच अशोकाची झाडे लावण्यात आलेली असतात. चला तर मग जाणून घेऊया अशोकाचं झाडं घरी लावण्याचे फायदे आणि योग्य दिशा.

Ashoka Plant
अशोकाचं झाड  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आपलं घर म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वास्तू असते.
  • वास्तूतील दोष टाळण्यासाठी लोकं बरेच प्रयत्न करत असतात.
  • घरात ठेवण्यात आलेल्या छोट्या छोट्या गोष्टी ही घरातील वास्तू दोष दूर करतात.

मुंबई: Vastu, Ashoka Tree Benefit: आपलं घर म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वास्तू असते. वास्तूतील दोष टाळण्यासाठी लोकं बरेच प्रयत्न करत असतात. तसंच घरात ठेवण्यात आलेल्या छोट्या छोट्या गोष्टी ही घरातील वास्तू दोष दूर करतात. तसंच घराची शोभा वाढवण्यासोबतच झाडे वास्तू दोष दूर करतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जे केवळ वातावरण शुद्ध करत नाहीत तर घरातील हवेतही शांतता राखतात. यातील एक वृक्ष म्हणजे अशोका वृक्ष आहे. 

अशोका या वृक्षाला हिंदू धर्मात अत्यंत लाभदायक आणि पवित्र मानलं जातं. बहुतेक लोकांच्या घरात उंच अशोकाची झाडे लावण्यात आलेली असतात. चला तर मग जाणून घेऊया अशोकाचं झाडं घरी लावण्याचे फायदे आणि योग्य दिशा.

अशोका झाडाचे फायदे 

  • अशोकाच्या झाडाचा त्याच्या नावाप्रमाणेच फायदा होतो. अशोका म्हणजे दु:ख दूर करणारा. हे झाडं घरामध्ये किंवा घराच्या आसपास लावल्यानं दुःख आणि दारिद्र्य दूर होते. घरात तणावमुक्त वातावरण राहून सुख-समृद्धी येते.
  • अशोकाचे झाडं हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अशोकाच्या पानांसह तोरण लावणं खूप शुभ मानलं जातं. ज्या घरात अशोकाचे झाड आहे त्या घरात वाईट शक्ती अजिबात राहत नाहीत.
  • वास्तूनुसार अशोकाचे झाड मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी हे झाड फलदायी आहे. वास्तू शास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या कोपऱ्यात अशोकाचे झाड लावल्यानं धनाची प्राप्ती होते.
  • असं मानलं जातं की ज्या घरात अशोकाचे झाड असते त्या घरात सर्व कामे विना अडथळा पूर्ण होऊन जातात. शुभ कार्यात याच्या पानांचा विशेष वापर केला जातो. घरामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला फक्त उत्तर दिशेला हे झाड लावा, तरच त्याचा पूर्ण फायदा होईल.
  • अशोकाच्या झाडाच्या मुळाशी अनेक उपाय शास्त्रात सांगण्यात आले आहेत. असं मानलं जातं की शुभ मुहूर्तावर त्याचे छोटे मूळ काढून गंगेच्या पाण्यानं स्वच्छ करावे. ही मुळं पूजेच्या ठिकाणी ठेवल्यानं वास्तुदोष दूर होतात.

अधिक वाचा-  दररोज नारळ पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, मग आजपासून सुरू करा प्यायला 


अस्वीकरण: येथे प्रदान केलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की Timesnowmarathi.com कोणत्याही प्रकारच्या विश्वासाला, माहितीला दुजोरा देत नाही. कोणतीही माहिती किंवा गृहितक लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी