नवीन घर घेताय, घर घेण्यापूर्वी या गोष्टींचा नक्की विचार करा

आध्यात्म
Updated Dec 20, 2019 | 17:36 IST | टाइम्स नाऊ हिंदी

नवीन घर घेताना काही बाबींचा विचार करणं खूप गरजेचं असतं. कारण जर आपण नवीन घर घेताना या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या याबाबत...

house
नवीन घर घेताय, घर घेण्यापूर्वी या गोष्टींचा नक्की विचार करा  |  फोटो सौजन्य: Getty Images
थोडं पण कामाचं
  • बंद गल्लीत घर घेणं योग्य नाही
  • झाडाची सावली घरावर पडत असेल तर असं घर घेऊ नये
  • रस्त्यावर तीन बाजूंनी उघडणारं घर घेऊ नये, घरात संकटं येतात

मुंबई: नवीन घर बनवताना किंवा विकत घेतांना वास्तूशास्त्रानुसार त्याचा विचार करणं गरजेचं आहे. घराची दिशा, दशा आणि आकार-प्रकार इत्यादींचं स्थान या सर्व बाबींचा विचार घर घेतांना करावा. जर या माहितीचा वापर आपण करून घेतला नाही तर कदाचित घरात नकारात्मक प्रभाव किंवा घराच्या कुटुंबप्रमुख किंवा सदस्यांना त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. योग्यप्रकारे घराची निवड केली तर आपली प्रगती होऊ शकते, आरोग्य चांगलं राहतं तसंच मानसिक स्थितीही उत्तम राहते. मात्र हेच जर आपण चुकीचं घर निवडलं तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नवीन घर घेतांना काही विशेष नियम आणि उपाय जाणून घ्या...

नवीन घर घेतांना वास्तुशास्त्र सांगतं काही नियम

  • वास्तुशास्त्रानुसार दक्षिणमुखी घर कधीही घेऊ नये. जर घर दक्षिणमुखी असेल तर घराचं प्रवेशद्वार हे उत्तर किंवा पूर्वेला असावं.
  • जेव्हा पण आपण कोणतं घर बघायला घ्यायला जात असाल तर एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं. ते म्हणजे घराच्या आसपास जर एखादी गल्ली असेल तर ती बंद असू नये. तसंच अशा गल्लीत शेती किंवा बगीचा नसावा. जर असं असेल तर यामुळे आपल्या बाळाच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो. जर गल्ली बंद असेल तर ५ किलो संपूर्ण उडदाची डाळ वाहत्या पाण्यात नदीत प्रवाहित करावी.
  • घर घेतांना एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी ती म्हणजे आपलं घर रस्त्यासमोर तीन बाजूंनी उघडणारं नसावं. अशा घरात पैशाची हानी, कुटुंबात कटुता, क्लेश आणि वाईट चालींची संतान मिळू शकते.
  • वास्तुशास्त्रानुसार घरात पायऱ्यांची संख्या ही सम प्रमाणात हवी आणि त्याखाली शौचालय असू नये. बाथरूम आणि शौचालय वेगवेगळे असावे, असं नसेल तर घरात राहणाऱ्यांचा विकास खुंटतो.
  • असं घर कधीही घेऊ नये ज्याच्या जवळपास बाभूळ, आंबा आणि खजूराचं झाड असेल. तसंच घरावर कुठल्याही झाडाची सावली पडत असेल, असं ही घर राहण्यासाठी निवडू नये. निर्जन क्षेत्र, दारू आणि नॉनव्हेजची विक्री होणाऱ्या दुकानाजवळ घर घेऊ नये. तसंच बाभूळ आणि कॅक्टसचं झाड लागलेलं असेल अशा घरातही राहायला जावू नये. वास्तूशास्त्रानुसार असं घर घेणं म्हणजे संकटांना आमंत्रण देणं होय.
  • तेव्हा नवीन घर घेतांना या गोष्टींचा नक्की विचार करावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी