Vastu Tips: तुम्ही चपात्या मोजून बनवता का? तर लगेच थांबवा नाहीतर...

आध्यात्म
Updated May 31, 2022 | 13:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

घरात जेवण बनवताना नेहमी ३-४ पोळ्या जास्तच बनवल्या पाहिजेत. ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे याचा वापर केला पाहिजे. केवळ घरातील सदस्यांना मोजून बनवलेल्या पोळ्या अनेक समस्यांचे कारण ठरू शकतात. 

roti
Vastu Tips: तुम्ही चपात्या मोजून बनवता का? तर लगेच थांबवा... 
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषाचार्यांच्या मते घरातील कुटुंबियांसाठी जेवणात जितक्या पोळींची गरज असते त्यापेक्षा ४ पोळ्या अधिकच बनवल्या पाहिजेत.
  • पहिली पोळी ही गायीसाठी बनवली पाहिजे. याचा आकार तवा जितका मोठा असेल तितका मोठा असला पाहिजे.
  • शेवटची पोळी ही नेहमी कुत्र्यासाठी बनवली पाहिजे.

मुंबई: जेव्हा विभक्त कुटुंबपद्धती आली आहे तेव्हापासून घरातील बऱ्याच गोष्टी बदलतात तसेच जेवणाबाबतचे नियमही बदलतात. एकत्र कुटुंबपद्धतीने जेवण हे काही माणसी हिशोबाने केले जात नाही. मात्र विभक्त कुटुंबपद्धतीत प्रत्येक माणसाला जितके अन्न लागणार आहे तितकेच मोजमापाने बनवले जाते. जेवणात केल्या जाणाऱ्या पोळ्यांचेही तसेच. प्रत्येक माणूस किती पोळ्या खाईल याच्या हिशेबाने त्या बनवल्या जातात. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या वाटच्या मोजून पोळ्या(roti) खाव्या लागतात.vastu tips for cooking rules 

वाढता लठ्ठपणा-आजार पाहता कमी खाण्याची ही ट्रिक दिसायला तरी चांगली दिसते मात्र यामुळे आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. यामुळे केवळ कुंडलीतील शुभ ग्रहांवरच परिणाम होत नाही तर घरात सुख-शांती-समृद्धी येते. तसेच कुटुंबियांचे आरोग्यही धोक्यात येते. जाणून घ्या पोळीचा ग्रहांशी काय संबंध आहे. 

अधिक वाचा - Team India: या मिस्ट्री गर्लशी लग्न करतोय भारतीय खेळाडू

नेहमी गरजेपेक्षा ४ पोळ्या जास्त बनवा

ज्योतिषाचार्यांच्या मते घरातील कुटुंबियांसाठी जेवणात जितक्या पोळींची गरज असते त्यापेक्षा ४ पोळ्या अधिकच बनवल्या पाहिजेत. यात पहिली पोळी ही गायीसाठी बनवली पाहिजे. याचा आकार तवा जितका मोठा असेल तितका मोठा असला पाहिजे. तर शेवटची पोळी ही नेहमी कुत्र्यासाठी बनवली पाहिजे. ही तोडन गायीच्या पोळीपेक्षा वेगळी ठेवा. उरलेल्या २ पोळ्या या पाहुण्यांसाठी ठेवल्या पाहिजेत. हिंदू धर्मात अतिथी देवो भव असे म्हटले जाते त्यामुळे घरात अप्रत्यक्षरित्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी या पोळ्या बनवल्या जातात. यामुळे घर कधीही रिकामे राहत नाही. तसेच अन्नपूर्णेची कृपा आपल्यावर राहते. 

शिळ्या पिठाची पोळी बनते वादासाठी कारण

जेव्हा चपात्या या मोजून केल्या जातात तेव्हा उरलेले पीठ हे फ्रिजमध्ये ठेवले जाते आणि दुसऱ्या दिवशी याचा वापर केला जातो. हे खरे तर वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे आहे. कारण यात निर्माण झालेले बॅक्टेरिया अनेक आजारांना निमंत्रण देतात. याशिवाय ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही हे चुकीचे आहे. 

पोळीचा संबंध सूर्य आणि मंगळशी असतो. पोळी आपल्याला उर्जा देते मात्र जेव्हा शिळ्या पीठापासून पोळी बनवली जाते तेव्हा त्यात निर्माण झालेल्या बॅक्टेरियाचा संबंध राहूशी येतो. अशी पोळी कुत्र्याला दिली पाहिजे. जेव्हा अशा शिळ्या पिठाची पोळी घरातले लोक खातात तेव्हा त्यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - लग्नात फोटोग्राफर नाही आला म्हणून नवरीने दिला लग्नास नकार 

नष्ट होतात वाईट कर्म

गायीला हिंदू धर्मात अतिशय पूजनीय मानले गेले आहे. ३३ कोटी देवता म्हणून गायीकडे पाहिले जाते. अनेक मुक्या जनावरांना जेवण देणे आणि त्यांची सेवा करणे चांगले कर्म मानले जाते. असे केल्याने व्यक्तीची वाईट कर्मे नष्ट होतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी