Vastu Tips For Tulsi: नियमीत पाणी टाकूनही अंगणातील तुळशी वाळते का; मग तेही आर्थिक संकटाची चाहूल

आध्यात्म
भरत जाधव
Updated Jul 11, 2022 | 12:49 IST

आपल्या हिंदू धर्मात तुळशीला (Tulsi Plant) पवित्र रोप मानले जाते. घरातील सुख-समृद्धीसाठी नियमित तुळशी पूजन (Tulsi Pujan) करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. तुळशीचा उपयोग (Use of Tulsi) केवळ धार्मिक विधींमध्येच नाही तर अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही (Tulsi Benefits) केला जातो.

Regular watering dries the basil in the yard? This is cause
नियमीत पाणी टाकूनही अंगणातील तुळशी वाळते? हे आहे कारण   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शास्त्रानुसार तुळशीचे रोप हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे.
  • धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते.
  • रविवार, एकादशी आणि ग्रहणाच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये

Vastu Tips For Tulsi : आपल्या हिंदू धर्मात तुळशीला (Tulsi Plant) पवित्र रोप मानले जाते. घरातील सुख-समृद्धीसाठी नियमित तुळशी पूजन (Tulsi Pujan) करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. तुळशीचा उपयोग (Use of Tulsi) केवळ धार्मिक विधींमध्येच नाही तर अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही (Tulsi Benefits) केला जातो. सकाळी आणि संध्याकाळी  तुळशीची पूजा केल्यानं घरात कोणतीही समस्या येत नाही. घरात सकारात्मक ऊर्जा देणारी तुळस ही तुळस तुम्हाला भविष्यात येणाऱ्या संकटांबाबतही सतर्क करते. 

संकटाचा इशारा

शास्त्रानुसार तुळशीचे रोप हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. तुळशीचे धार्मिक तसेच आयुर्वेदात अनेक उपयोग सांगण्यात आले आहे. तुळस तुम्हाला वाईट नजरेपासून वाचवते आणि येणाऱ्या संकटांबाबत सूचित देखील करते. बहुतेक वेळा तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल की आमच्याकडे तुळशीचं रोप टिकत नाही. ते जळून  जातं. ज्या लोकांच्या घरी तुळशीच्या रोपाविषयी ही समस्या असेल तर तुमच्या समस्याचं कारण या लेखात आहे.. जर तुमच्या घरात तुळशीचे रोप अचानकपणे सुकत असेल तर समजा घरात काहीतरी संकट येणार आहे. शास्त्रानुसार तुळस वाळणे म्हणजे घरात गरिबी, अशांतता किंवा संकटाचे वातावरण येण्याचे संकेत असते. किंवा त्या घरावर आर्थिक संकट नेहमी राहत असते. 

Read Also : विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा दणका, सुनावली शिक्षा

लक्ष्मीचा वास

धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते. घरात सुख-समृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभण्यासाठी घरांमध्ये तुळशीचे रोप लावून तिची नियमित पूजा केली जाते. ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि त्या घरात कधीही नकारात्मकता प्रवेश करत नाही. 

Read Also : उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला तर खासदारांचं बंड होणार थंड

या दिवशी करू नये तुळशी पूजा

शास्त्रानुसार रविवार, एकादशी आणि ग्रहणाच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये आणि तुळशीची पानेही तोडू नयेत. पण तुम्हाला हवे असल्यास रविवारी पाण्याऐवजी दूध अर्पण करून तुपाचा दिवा लावू शकता. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.

Read Also: भगवान वामन यांच्या आशीर्वादाने घरात नांदेल सुख, शांती

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी