Vastu Tips how to keep broom for wealth : आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक वस्तू वापरतो. या वस्तूंपैकी अनेक अशा वस्तू आहेत ज्यांचे महत्त्व आपण ओळखत नाही. यामुळे त्या वस्तू दुर्लक्षित होतात. जर वेळीच या वस्तूंचे महत्त्व ओळखून त्या व्यवस्थित हाताळल्या तर आर्थिक सुबत्ता येऊ शकते.आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.
आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून पैसे आणि मौल्यवान वस्तू घरात एखाद्या तिजोरीत किंवा चोरकप्प्यात ठेवतात. बाहेरून येणाऱ्या कोणालाही या मौल्यवान वस्तू दिसणार नाही अशी खबरदारी घेतली जाते. यामुळे घरातील सुबत्ता टिकून राहते. मौल्यवान वस्तू सुरक्षित राहतात. याच पद्धतीने झाडू घरात, ऑफिसमध्ये विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट पद्धतीने ठेवल्यास घरातील लक्ष्मी सुरक्षित राहते. धनवृद्धी होते. आर्थिक सुबत्ता येते.