Vastu Tips: झोपताना 'या' दिशेला करु नका पाय, तुमच्या आयुष्यातील काही वर्षे होतील कमी

Vastu Tips : झोपण्याच्या संदर्भात वास्तुशास्त्रात काही टिप्स आणि महत्त्वाची माहिती सांगण्यात आली आहे. कुठल्या दिशेला तोंड आणि कुठल्या दिशेला पाय करुन झोपावे याबाबतही सांगण्यात आले आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • झोपताना वास्तू नियम लक्षात ठेवा
  • वास्तू नियमांकडे दुर्लक्ष केल्यास प्रगतीच्या मार्गावर अडथळा येऊ शकतो

Vastu Tips in Marathi: वास्तूशास्त्रात सांगण्यात आले आहे की, झोपताना कुठल्या वास्तू नियमांची काळजी घेणं आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. या वास्तू नियमांची तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकते. झोपताना कुठल्या दिशेला तोंड आणि कुठल्या दिशेला पाय असावेत यासंदर्भात सांगण्यात आले आहे. तसेच माणसाच्या दैनंदिन दिनचर्येत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जाणून घ्या झोपताना कोणते वास्तू नियम पाळले पाहिजेत. (Vastu tips in marathi do not sleep in this direction otherwise you may face problem)

झोपताना या दिशेला पाय करू नका

वास्तूशास्त्रानुसार, कुठल्याही व्यक्तीने कधीही अशा प्रकारे झोपू नये की त्याचे पाय उत्तर किंवा दक्षिण दिशेला असतील. कारण, भगवान लक्ष्मी आणि कुबेर उत्तरेला तर पितरांचा सहवास दक्षिणेला असतो. त्यामुळे अशा स्थितीत व्यक्तीला पैशाच्या हानीसोबतच विविध आजारांना सामोरे जावे लागते आणि त्यासोबतच वय सुद्धा कमी होते.

अधिक वाचा : रात्रीचे केस कापले तर काय होतं?, खरंच अशुभ असतं?; जाणून घ्या काय आहे कारण

या दिशेला डोके ठेवून झोपा 

दक्षिण आणि उत्तर : वास्तूशास्त्रानुसार, उत्तर किंवा दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपता येते. यामुळे आरोग्य चांगले राहते. यासोबतच वयातही वाढ होते.

पूर्वेकडे डोके : पूर्वेकडे डोके ठेवून झोपणे देखील चांगले मानले जाते. या दिशेला डोके ठेवून झोपल्याने एकाग्रता वाढते. यासोबतच स्मरणशक्ती जलद होते.

पश्चिमेकडे डोके : पश्चिमेकडे डोके ठेवून झोपणे देखील शुभ मानले जाते. कारण या दिशेचा स्वामी वरुण देव आहे. अशा स्थितीत या दिशेला डोके ठेवून झोपल्याने आदर वाढतो.

बेडची दिशा : वास्तूशास्त्रानुसार, पलंग कधीही दारासमोर नसावा. यामुळे तणावाखाली असण्यासोबतच व्यक्तीला अनेक प्रकारची वाईट स्वप्ने पडतात.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी