Vastu Tips: घर खरेदी करण्याचे प्लॅनिंग तुम्ही करत असाल तर केवळ घराचा एरिया किंवा किती मोठं घर आहे हे पाहू नका. घर खरेदी करताना वास्तूशी संबंधित काही गोष्टींचा जरूर विचार करावा. यामुळे तुमचे घर तुमच्यासाठी भाग्यवान आणि समृद्ध होईल. (Vastu tips in marathi for buying new home read details)
घर खरेदीसाठी वास्तू टिप्स : सध्याच्या काळात प्रत्येकाला वास्तूदोषाची माहिती आहे. पण बहुतेक लोक हे समजतात की, वास्तू दोष फक्त घराच्या आत होतो. वास्तूच्या मदतीने आपण ते दुरुस्त देखील करू शकतो. पण अनेकदा त्याचे परिणाम दिसून येत नाहीत. यामागे घराबाहेरील वास्तूदोष देखील असू शकतो. घराबाहेरील वास्तू दोष घरात राहणाऱ्या सदस्यांच्या जीवनात समस्या आणू शकतात. तसेच लोकांच्या प्रगतीतही अडथळा निर्माण होतात. घर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी पाहूयात.
वास्तूशास्त्रानुसार, घराजवळ धार्मिक स्थान असेल तर त्यामुळे ऊर्जा खूप सकारात्मक आणि उच्च पातळीवरची असते. या स्थानाची शक्ती इतकी सकारात्मक ऊर्जा आहे की, तिच्या संपर्कात आल्याने त्याचा मनुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. धार्मिक स्थळाजवळ राहणे माणसाचे जीवन तणावपूर्ण बनवू शकते.
अधिक वाचा : Mangal Planet transit : मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीत गोचर, या तीन राशीच्या लोकांना होणार धनलाभ
वास्तूनुसार, घराजवळ कोणतेही झाड किंवा खांब नसावे. जेव्हा असे होते तेव्हा माणसाला प्रत्येक कामात कोणत्या ना कोणत्या अडथळ्याचा सामना करावा लागतो.
अधिक वाचा : Vastu Tips: घरात लावा फाऊंटन अथवा वॉटरफॉल, येईल खूप पैसा
आपल्या घराच्या शेजारी रुग्णालय नसावे. कारण, आजारी लोक रुग्णालयात उपचार घेतात. जो कमकुवत आहे. अशा लोकांमुळे नकारात्मक ऊर्जेची पातळी खूप जास्त असते. त्यामुळे रुग्णालयाच्या जवळ राहणारे लोक कधीही शांततेत राहू शकत नाही.
कोणाच्या तरी घराच्या आजूबाजूला जुन्या इमारती असल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. जर राजा महाराजांच्या काळातील असेल आणि तो वाडा बंद असेल तर अशा ठिकाणी खूप नकारात्मक ऊर्जा असते.
घराच्या जवळ टी पॉईंट नसावे. म्हणजेच तीन गल्ल्या किंवा तीन रस्ते मिळतात असे नसावे. अशा परिसरात घर असणे हे शुभ मानले जात नाही.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)