पैसे मोजताना कधीही ‘या’ चुका करू नका, नाहीतर वाईट परिणाम होऊ शकतात

आध्यात्म
Updated Nov 25, 2019 | 13:57 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Lakshmi and Vastu Tips: काही लोक पैसे मोजताना काही चुका करून बसतात. मात्र अशी चूक झाली तर लक्ष्मी देवी रुष्ट होऊ शकते. घरात जर पैशांची चणचण जाणवत असेल तर पैसे मोजताना खालील चुका अजिबात करू नये.

Lakshmi And Vastu Tips
पैसे मोजताना कधीही ‘या’ चुका करू, नाहीतर 'हे' परिणाम होतील 
थोडं पण कामाचं
  • देवी लक्ष्मीच्या पूजनानं धन-संपत्ती प्राप्त होते
  • पर्समध्ये पैशांसोबत कधीही खाण्या-पिण्याच्या वस्तू ठेवू नयेत
  • रात्री झोपताना पैसे कधीही डोक्याखाली ठेवू नयेत

Vastu Tips for Money: धन आणि संपत्तीची देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते, त्या घरात कधीही दारिद्र्य येत नाही. देवी लक्ष्मी ही श्री विष्णूंची पत्नी आहे, लक्ष्मीमातेच्या पूजनानं संपत्ती आणि वैभवाची प्राप्ती होते. मात्र जर लक्ष्मी देवी नाराज झाल्या तर गरीबीचा सामना करावा लागू शकतो.

देवी लक्ष्मी क्रोधीत किंवा नाराज होण्याचे अनेक कारणं असू शकतात. मात्र त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे की, पैसे मोजतांना आपण करतो त्या चुका. शास्त्रांनुसार पैशांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. मग ते पैसे कुठल्याही रूपात ठेवलेले असो. जर आपण पैसे ठेवताना कुठल्याही प्रकारची चूक केली, तर देवी नाराज होऊ शकते. असं बघितलं गेलंय की, अनेक लोक पैसे मोजताना काही चुका करतात, त्यामुळे वित्तहानी होते, जाणून घ्या त्याबाबत...

 

 

पैसे मोजताना ‘या’ चुका करू नये

थुंकीचा वापर करू नये: वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या घरात खूप पैसा आहे, मात्र जेव्हा गरज असते तेव्हा तो कामी पडत नाही, हातून निघून जात असेल तर समजून घ्यावं काहीतरी चुकलंय. वास्तुशास्त्रानुसार नोट मोजताना कधीही त्यावर थुंकू नये, असं केल्यास पैशांचा अनादर होत असतो. जर नोटा एकमेकांना चिकटलेल्या असतील तर एका वाटीत पाणी घेऊन हलक्या हातानं बोटाला पाणी लावून नोट वेगळ्या कराव्यात, पण थुंकीचा वापर करू नये.

खाण्या-पिण्याच्या वस्तू ठेवू नये: पर्समध्ये नोटांसोबत कधीही खाण्या-पिण्याच्या वस्तू ठेवू नये. तसंच पर्समध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या बिलाची रसीद ठेवू नये. याशिवाय आपल्या पर्समधून किंवा हातातून पैसे खाली पडले तर ते हातानं उचलून डोक्याला लावून त्याला नमस्कार करून मगच पर्समध्ये ठेवावेत. आपण जर वरील गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर भविष्यात आर्थिक संकटांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो.

रात्री झोपताना कधीही डोक्याखाली पैसे ठेवू नये: अनेकदा रात्री झोपताना पैसे डोक्याखाली ठेवून झोपायची सवय अनेकांना असते. मात्र असं करू नये. झोपताना पैसे डोक्याखाली ठेवू नयेत. पैसे घरात तिजोरीत आणि कपाटातच ठेवावेत. सोबत देवी लक्ष्मीचं गोमती चक्र ठेवावं.

रस्त्यावर पडलेली नोट काय सांगते: जर आपल्याला रस्त्यावर पडलेली एखादी नोट सापडली, तर याचा अर्थ आपल्याला आपली परिस्थिती गंभीरपणे घेणं आवश्यक आहे. आपल्याला स्वत:वर विश्वास ठेवत आपल्या निर्णयाना कार्यरूप देण्याची गरज आहे. त्यानं आपल्याला योग्य यश मिळेल त्यासाठी स्वत:वर विश्वास आणि नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी