Vat Savitri Vrat 2022: वट सावित्रीचे व्रत २९ की ३० मे रोजी? इथे पाहा तारीख आणि पूजेचा मुहूर्त 

आध्यात्म
Updated May 26, 2022 | 09:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vat Savitri Vrat 2022 Date Time । वट सावित्रीचे व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील आमावस्येला केले जाते. यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये वट सावित्री व्रताच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.

Vat Savitri vrat on 29th or 30th May, See here the date and the moment of worship
वट सावित्रीचे व्रत २९ की ३० मे रोजी? वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वट सावित्रीचे व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील आमावस्येला केले जाते.
  • पंचांगानुसार रविवारी २९ मे रोजी दुपारी ०२.५४ पासून ज्येष्ठ महिन्याची आमावस्या सुरू होत आहे.
  • वटवृक्षाची पूजा केल्याने दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते.

Vat Savitri Vrat 2022 Date Time । मुंबई : वट सावित्रीचे व्रत (Vat Savitri Vrat) दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील आमावस्येला केले जाते. यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये वट सावित्री व्रताच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. व्रत पाळणाऱ्या महिलांमध्ये हे व्रत २९ मे की ३० मे रोजी करावे याबाबत गोंधळाचे वातावरण आहे. (Vat Savitri vrat on 29th or 30th May, See here the date and the moment of worship). 

दरम्यान, असे मानले जाते की वट सावित्रीचे व्रत पाळणे तसेच भगवान विष्णू आणि आणि आई लक्ष्मीजींची पूजा केल्याने अखंड सौभाग्य, सुखी वैवाहिक आयुष्य आणि पतीला दीर्घायुष्य मिळते. यासोबतच या दिवशी विवाहित महिलांनी सावित्री, सत्यवान आणि वटवृक्ष म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करण्याचीही परंपरा आहे. वटवृक्षासह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करताना वट सावित्री व्रताची कथा ऐकण्याचीही परंपरा आहे.

वट सावित्री व्रताची योग्य तारीख 

हिंदू पंचांगानुसार रविवारी २९ मे रोजी दुपारी ०२.५४ पासून ज्येष्ठ महिन्याची आमावस्या सुरू होत आहे. ज्येष्ठ आमावस्या तिथीची समाप्ती सोमवार ३० मे रोजी दुपारी ०४.५९ वाजता होईल. शास्त्रानुसार व्रतामध्ये उदय तिथीचा फक्त विचार केला जातो. त्यामुळे वट सावित्रीच्या व्रतासाठी आमावस्येची उदय तिथी पाहिली जाईल. अमावस्या तिथी ३० मे रोजी सूर्योदयाच्या वेळी येत आहे तसेच ही तिथी ३० मे रोजी सायंकाळी ४.५९ वाजता समाप्त होत आहे. अशा परिस्थितीत ३० मे रोजी वट सावित्रीचे व्रत करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ०७.१२ पासून सर्वार्थ सिद्धी योग सुरू होत आहे, हा योग संपूर्ण दिवसभर राहणार आहे. अशा स्थितीत या दिवशीचा उपवास अत्यंत फलदायी ठरेल.

वट सावित्री व्रताचे महत्त्व 

वटवृक्षाची पूजा केल्याने दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते, असे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी सावित्रीने यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते. तेव्हापासून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी उपवास करतात.

वट सावित्रीच्या पूजेचे साहित्य

वट सावित्रीच्या पूजेच्या साहित्यामध्ये सावित्री-सत्यवानाच्या मूर्ती, धूप, दिवा, तूप, बांबूचा पंखा, कुंकू, मधाची पोळी, कापूस, भिजवलेले हरभरे, वडाची फळे, पाण्याने भरलेला कलश इत्यादींचा समावेश असावा. 

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरूअसलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी