Vijaya Smart Ekadashi Vrat 2023 in Marathi : महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचागानुसार (शके संवत्सर) माघ महिन्यातील कृष्ण पक्षातल्या एकादशीच्या दिवशी येणाऱ्या तिथीला विजया स्मार्त एकादशी या नावाने ओळखले जाते. यंदा विजया स्मार्त एकादशी गुरुवार 16 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. पद्म पुराणातील उल्लेखानुसार एकादशीच्या दिवशी विष्णू देवाची मनापासून उपासना केली तर अनेक अडचणी दूर होतात. रखडलेली कामं होतात. प्रगती होते. आर्थिक अडचणी दूर होतात. पापांतून मुक्ती मिळते. यामुळे विजया स्मार्त एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे.
यंदा विजया स्मार्त एकादशी गुरुवार 16 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. एकादशी या तिथीचा आरंभ 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 05.33 वाजता होईल. तिथीचा समारोप शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 रोजी मध्यरात्री 02.50 वाजता होईल.
एकादशी या तिथीच्या काळात ज्या दिवशी सूर्योदय होणार आहे त्याच दिवशी एकादशीचे व्रत करतात. या नियमानुसार गुरुवार 16 फेब्रुवारी 2023 रोजी विजया स्मार्त एकादशीचे व्रत करणे योग्य आहे.
विजया स्मार्त एकादशीचे व्रत गुरुवार 16 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 05.33 वाजल्यापासून सुरू होईल आणि शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 रोजी मध्यरात्री 02.50 वाजता संपेल. एकादशीच्या व्रताचे पारायण शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 07.05 ते दुपारी 12 या वेळेत करता येईल.
विजया स्मार्त एकादशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ करुन धूतवस्त्र परिधान करा. नंतर पूजा करण्यासाठी एक चौरंग तयार करा. चौरंगावर पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर विष्णू देवाची मूर्ती किंवा फोटो यांची प्रतिष्ठापना करा. विष्णू देवाची फळे, फुले, नारळ, पान सुपारी, लवंग यांनी पूजा करा. पूजेनंतर विष्णू देवाची आरती करा. विष्णू देवाला नैवेद्य अर्पण करा. विष्णू देवाला तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्या.
एकादशीचे व्रत ज्या दिवशी कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे उठून नित्यकर्म आटोपून घ्यावी. आंघोळ करावी. धूतवस्त्र परिधान करावे. ब्राह्मणांना आणि गरजूंना यथाशक्ती दान करावे. दानधर्म करुन विजया स्मार्त एकादशीच्या व्रताचा समारोप करावा.
एकादशी हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला (पंधरवड्यातला) अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातल्या दोन पंधरवड्यांत (पक्षांत) प्रत्येकी एक अशा प्रकारे दोन वेळा एकादशी येते. मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात महिन्यातला कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाच्या आधी येत असल्याने कृष्ण पक्षात येणारी विशिष्ट नावाची एकादशी नंतरचे नाव असलेल्या महिन्यात येते. उदा : ज्या दिवशी महाराष्ट्रात आषाढ महिन्यातील कामिका एकादशी असते, त्यादिवशी मध्य प्रदेशात श्रावण महिन्यातली कामिका एकादशी असते. हा प्रकार शुक्ल एकादशींच्या बाबतीत होत नाही.
कृष्णाने युधिष्ठिराला विजया स्मार्त एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. या व्रताचे पुण्य लाभल्यामुळे महाभारत झाले त्यावेळी पुण्य कामी आले. युधिष्ठिरासह पांडव सैन्याला लढाईत विजय मिळवणे सोपे झाले असे सांगतात.
रामाने लंकेवर स्वारी करण्याआधी विजया स्मार्त एकादशीचे व्रत केले होते. नंतर समुद्रात दगडांचा सेतू उभारून लंकेत प्रवेश केला. पुढे राम लक्ष्मणाच्या सैन्याला लढाईत विजय मिळवणे सोपे झाले असे सांगतात.
कधी आहे महाशिवरात्र 2023, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त
या मंदिरात यमराजाचे न्यायालय, स्वर्ग किंवा नरकात पाठवण्याचा होतो निर्णय
Disclaimer / डिस्क्लेमर : मजकूर संकलित आहे. Times Now Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. Times Now Marathi कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत.