Vinayak Chaturthi 2022 Message in Marathi: एप्रिल महिन्यातील विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा Messages शेअर करा

भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता, त्यामुळे या दिवसला विनायक चतुर्थी म्हटली जाते. अनेक ठिकाणी ही चतुर्थी वरद विनायक चतुर्थी आणि गणेश चतुर्थी नावानेही ओळखली जाते.

vinayak chaturthi messages in marathi share on whatsapp and social media
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा Messages शेअर करा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • Vinayak Chaturthi 2022 Wishes Marathi : आज आहे अंगारक योग असलेली विनायक चतुर्थी
  • विनायक चतुर्थीचे गणेश भक्त मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात.
  • आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना सोशल मिडियाद्वारे संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा द्या. 

Vinayak Chaturthi 2022 Wishes Marathi : मुंबई : भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता, त्यामुळे या दिवसला विनायक चतुर्थी म्हटली जाते. अनेक ठिकाणी ही चतुर्थी वरद विनायक चतुर्थी आणि गणेश चतुर्थी नावानेही ओळखली जाते. या दिवशी गणपतीची पुजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.  विनायक चतुर्थी निमित्ताने आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना सोशल मीडियाद्वारे फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप स्टेटसच्या (WhatsApp Status) माध्यमातून एकमेकांना विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा द्या. 

यंदा एप्रिल महिन्यातील पहिली विनायक चतुर्थीला अंगारक योग आहे. 

vinayak chaturthi

एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

Vinayak Chaturthi 2022 Wishes in Marathi 1

विनायक निमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना

सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो

हिच बाप्पा चरणी प्रार्थना

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

Vinayak Chaturthi 2022 Wishes in Marathi 2


प्रथम तुला वंदितो गणराया

तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया

तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया

सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

Vinayak Chaturthi 2022 Wishes in Marathi 3
गजानना श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

मंगलमूर्ती श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

Vinayak Chaturthi 2022 Wishes in Marathi
ॐ गं गणपतये नमो नम:
श्री सिद्धिविनायक नमो नम: 
अष्टविनायक नमो नम:  
गणपती बाप्पा मोरया ...
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी