Vishwakarma Pooja: भगवान विश्वकर्मा कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याबाबतच्या 8 महत्त्वाच्या गोष्टी

Lord Vishwakarma Pooja 2022: भगवान विश्वकर्मा हे पहिले अभियंता मानले जातात. या दिवशी कारखाने, संस्था, दुकाने या ठिकाणी जे उपकरणे आणि यंत्रे, वापरले जातात या साधनांची पूजा केली जाते.

Vishwakarma Pooja 2022 know all about lord vishwakarma and 8 important things read in marathi
Vishwakarma Pooja: भगवान विश्वकर्मा कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याबाबतच्या 8 महत्त्वाच्या गोष्टी 
थोडं पण कामाचं
  • 17 सप्टेंबर रोजी भगवान विश्वकर्मा पूजा
  • कन्या संक्रांतीच्या दिवशी भगवान विश्वकर्मा यांची पूजा केली जाते

Bhagwan Vishwakarma Pooja date: विश्वकर्मा पूजा हा एक सण आहे. जेथे कारागीर, शिल्पकार, श्रमिक हे भगवान विश्वकर्माचा उत्सव साजरा करतात. मान्यतेनुसार ब्रह्मदेव ज्यावेळी सृष्टीची निर्मिती करत होते त्यावेळी भगवान विश्वकर्मा यांनी त्यांना मदत केली. भगवान विश्वकर्मा यांना देवतांच्या महलांचे वास्तू शिल्पकार देखील म्हटले जाते. यामुळेच भगवान विश्वकर्मा हे जगातील पहिले अभियंता आणि वास्तू विशारद मानले जातात. विश्व (संसार किंवा ब्रह्मांड) आणि कर्म (निर्माता) या दोन शब्दांपासून विश्वकर्मा शब्द बनला. यामुळेच विश्वकर्मा या शब्दाचा अर्थ जगाचा निर्माता असा होतो. भगवान विश्वकर्मा हे पहिले अभियंता मानले जातात. या दिवशी कारखाने, संस्था, दुकाने या ठिकाणी  जे उपकरणे आणि यंत्रे, वापरले जातात  या साधनांची पूजा केली जाते.  (Vishwakarma Pooja 2022 know all about lord vishwakarma and 8 important things read in marathi)

हे पण वाचा: Mahabharat वर येणार बिग बजेट सिनेमा

Vishwakarma Day

विश्वकर्मा पूजा कधी? 

यंदाच्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी म्हणजेच शनिवारी विश्वकर्मा पूजा आहे. या दिवशी सूर्याची कन्या संक्रांती सुद्धा आहे. या दिवशी सूर्य सिंह राशीतून बाहेर पडेल आणि कन्या राशीत प्रवेश करणार आहे. प्रत्येकवर्षी कन्या संक्रांतीच्या दिवशी विश्वकर्मा पूजा केली जाते. भगवान विश्वकर्मा हे देवतांचे शिल्पकार, जगातील पहिले अभियंता, वास्तूशास्त्राचे जाणकार, अभ्यासक सुद्धा आहेत. यंदाच्या या विश्वकर्मा पूजा निमित्त जाणून घेऊयात भगवान विश्वकर्मा यांच्याविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टी.

Vishwakarma Day

हे पण वाचा: 16 सप्टेंबर : 'या' राशींचं नशीब फळफळणार

भगवान विश्वकर्मा यांच्या संदर्भातील तथ्ये

  1. विष्णू पुराणानुसार भगवान विश्वकर्मा हे देवतांचे लाकूडकाम करणारे मानले जातात. पुराणात त्यांच्यासाठी वर्धकी म्हणजे लाकूडकाम अशा शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे. 
  2. वास्तूदेवाचा विवाह अंगिरसी नावाच्या कन्येसोबत झाला होता. त्या दोघांपासून भगवान विश्वकर्मा यांचा जन्म झाला. वास्तूदेव ब्रह्मा यांचे पूत्र धर्मपुत्र आहे. 
  3. ब्रह्मदेवाने भगवान विश्वकर्मा यांची विश्वाचे शिल्पकार म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी स्वर्ग लोक, इंद्रपुरी, द्वारिका नगरी, सोन्याची लंका, सुदामापुरी अशा अनेक नगरांची आणि ठिकाणांची निर्मिती केली. 
  4. भगवान विश्वकर्मा यांनी यमराजाचे कालदंड, भगवान विष्णूचे सुदर्शन चक्र, भगवान शंकराचे त्रिशूल, पुष्पक विमान याच्यासह अनेक शस्त्र आणि उपकरणांची निर्मिती केली. 
  5. भगवान विश्वकर्मा यांना यंत्र, साधने, उपकरण यांचेही देवता मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या सृष्टीत निर्माण झालेल्या सर्व गोष्टींचे मूळ भगवान विश्वकर्मा आहेत. 
  6. असं म्हटले जाते की, भगवाव विश्वकर्मा यांनी सर्वप्रथम सृष्टीचे मानचित्र (नकाशा) बनवला. 
  7. भगवान विश्वकर्मा यांचे पाच अवतार आहेत. त्यामध्ये विराट विश्वकर्मा, धर्मवंशी विश्वकर्मा, अंगिरावंशी विश्वकर्मा, सुधन्वा विश्वकर्मा आणि भृगुवंशी विश्वकर्मा आहेत. 
  8. भगवान विश्वकर्मा यांचे पाच पूत्र आहेत. मनु, मय, त्वष्टा, शिल्पी आणि दैवज्ञ आहे. याच्या व्यतिरिक्त जय, विजय आणि सिद्धार्थ या तीन मुलांचाही उल्लेख आढळतो. हे सर्व शिल्पशास्त्र आणि वास्तू शास्त्राचे अभ्यासक, विद्वान होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी